राज्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीची लगबग सुरू असताना आता भाजपाने त्यांचा उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.
त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेतील नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहीत अंधेरी पोट निवडणुक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “तुम्ही तुमच्या राजकीय वजनाचा वापर करुन भाजपाशी संवाद साधावा आणि ही निवडणूक बिनविरोध कशी होईल हे पाहावं. कारण आपली राजकीय संस्कृती असं सांगते की एखाद्या नेत्याचं निधन झालं की त्याच्या कुटुंबातील सदस्याला बिनविरोध निवडून दिलं जातं. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपावं.”
स्वर्गीय आ.रमेश लटके माझे अत्यंत जवळचे सहकारी,मित्र होते.त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही मी पूर्णपणे सावरू शकलो नाही.दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबीयांना बिनविरोध निवडून देण्याची महाराष्ट्रात अलिखित अशी राजकीय संस्कृती आहे. pic.twitter.com/a44yljU87C
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) October 16, 2022
हे ही वाचा
बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’
आधी राज ठाकरे आणि नंतर शरद पवार यांनी अंधेरी पूर्वची निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी केली होती. आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केल्यानंतर भाजपची भूमिका काय असणार आहे याकडे लक्ष असणार आहे.