26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणबाळासाहेबांच्या शिवसेनेतील 'हा' आमदार म्हणतो अंधेरी निवडणूक बिनविरोध करा

बाळासाहेबांच्या शिवसेनेतील ‘हा’ आमदार म्हणतो अंधेरी निवडणूक बिनविरोध करा

राज्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीची लगबग सुरू असताना आता भाजपाने त्यांचा उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Google News Follow

Related

राज्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीची लगबग सुरू असताना आता भाजपाने त्यांचा उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.

त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेतील नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहीत अंधेरी पोट निवडणुक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “तुम्ही तुमच्या राजकीय वजनाचा वापर करुन भाजपाशी संवाद साधावा आणि ही निवडणूक बिनविरोध कशी होईल हे पाहावं. कारण आपली राजकीय संस्कृती असं सांगते की एखाद्या नेत्याचं निधन झालं की त्याच्या कुटुंबातील सदस्याला बिनविरोध निवडून दिलं जातं. त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपावं.”

हे ही वाचा

बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

आधी राज ठाकरे आणि नंतर शरद पवार यांनी अंधेरी पूर्वची निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी केली होती. आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केल्यानंतर भाजपची भूमिका काय असणार आहे याकडे लक्ष असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा