मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेनेच्या तिजोरीत

मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेनेच्या तिजोरीत

मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार एव्हाना समस्त मुंबईकरांना ठाऊक आहे. परंतु आता एक नवीन बाब समोर आल्यामुळे महापालिकेच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. “महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय,” असा थेट आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहून बाळा नांदगावकर यांनी या भ्रष्टाचाराला वाचा फोडली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी आयुक्तांना पत्राच्या माध्यमातून हे निवेदन दिले आहे.

मुंबईकरांच्या मुलभूत सोयीसुविधांसाठी महापालिकेकडून १००० ते १५०० कोटी रुपयांची तरतूद झालेल्या निधीत ई निविदा काढताना सत्ताधारी पक्षाच्या दबावात येऊन अभियत्यांकडून भ्रष्टाचार होत आहे. परिपत्रक काढून रक्कमेच्या १५ टक्के पेक्षा अधिक खालच्या दराने निविदा पात्र होणाऱ्या कंत्राटदारांना दर विश्लेषण देऊनही कामे परस्पर रद्द केली जातात हा महापालिकेच्या निधीचा अपयव्य आहे असा घणाघाती आरोप नांदगावकर यांनी केलेला आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या उफराट्या कारभारावर अधिक प्रश्न निर्माण झाले आहेत.

१००० ते १५०० कोटी रुपयांची तरतूद झालेल्या निधीत ई निविदा काढताना सत्ताधारी पक्षाच्या दबावात येऊन अभियत्यांकडून भ्रष्टाचार होत असून महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय, असा आरोप केल्यामुळे आता अधिक घोटाळे बाहेर पडतील की काय अशी चिन्हं दिसू लागली आहेत. महापालिका निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना, नांदगावकर यांनी केलेले आरोप हे खरोखरीच विचारात घेण्यासारखे आहेत.

बाळा नांदगावकर यांनी पत्रामध्ये अनेक मुद्द्यांवर कटाक्ष टाकलेला आहे. यामध्ये देखभाल विभागाच्या अभियंत्यांकडून अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याचं म्हटलं तर आहेच. शिवाय महापालिकेतील मराठी व्यवसायात संघर्ष करणारे कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंते यांचं निवेदनही त्यांनी जोडलेले आहे. महापालिकेच्या निधीचा अपव्यय कोणत्या मार्गाने होत आहे हेही त्यांनी पत्रात मांडले आहे.
सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांकडून अभियंत्यावर विविध कारणांनी दबाव आणला जात असल्याचा मुद्दा यावेळी नांदगावकर यांनी उपस्थित केलेला आहे.

हे ही वाचा:

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

हा भारताच्या संघ भावनेचा विजय

जाहीर होणाऱ्या ई निविदांमध्ये कामाचा एकूणच तपशील का टाळला जातो असा प्रश्नच नांदगावकर यांनी विचारून पालिकेच्या भोंगळ कारभाराचा उत्कृष्ट नमुना जनतेसमोर आणलेला आहे. मुंबईकरांच्या कराच्या निधीचा कसा दुरुपयोग केला जातोय, हेही त्यांनी पत्राच्या माध्यमातून स्पष्ट केलेले आहे. सत्ताधारी पक्ष तसेच अभियंते यांचे साटेलोटे असून, महापालिकेचा निधी थेट पक्ष वापरत असल्याचा आरोपच पत्रातून करण्यात आलेला आहे. त्यामुळेच सदर घोटाळा हा समोर यावा, त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता मनसेने केली आहे. अन्यथा पक्षाने आंदोलनाचे हत्यार उपसणार असा सज्ज्ड इशारा दिला आहे.

Exit mobile version