बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पहाटे अहमदाबाद गुजरात काँग्रेसच्या राज्य मुख्यालयाच्या इमारतीवर पोस्टर चिकटवले, तसेच पक्ष कार्यालयाचे नाव बदलून ‘हज हाऊस’ असे करण्यात आले आहे. गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांच्या अल्पसंख्यांकांबद्दलच्या अलीकडील वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी ही कारवाई केल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.
जगदीश ठाकोर यांनी बुधवारी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क असायला हवा या मताला दुजोरा दिला आणि निवडणुकीत पराभूत झालो काँग्रेस या विचारसरणीपासून दूर जाणार नाही, असे प्रतिपादन केले. ठाकोर यांच्या या वक्तव्यावर संतप्त होऊन, बजरंग दलाचे कार्यकर्ते अहमदाबादमधील काँग्रेस कार्यालयात पोहोचले. स्टिकर्स आणि रंगांसह नाव बदलले.
येथील आवारात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्यावर हज हाऊस असे लिहिलेले स्टिकरही चिकटवण्यात आले आहे. बजरंग दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या कार्यालयाचे नाव हज हाऊस ठेवले आहे. त्यावर काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याप्रकरणी पक्षाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात येत असल्याचे समजते.
हे ही वाचा:
चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात
पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार
महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी
मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण
गुजरात विहिंपचे प्रवक्ते हितेंद्र सिंह राजपूत म्हणाले, “गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले होते की देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे. , हा पक्ष एकीकडे धर्मनिरपेक्षता आणि समतेच्या गप्पा मारतो आणि मग मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण करतो. आम्ही या धर्मकेंद्रित राजकारणाच्या विरोधात आहोत. कारण त्यामुळे देशात आणि समाजात फूट निर्माण होते. हा देश सर्व १३५ कोटी नागरिकांचा आहे