कर्नाटकातील निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात असून निवडणूक प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरूमध्ये आहेत. २६ किलोमीटरच्या या मेगा रोड शोमध्ये भाजपा समर्थकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी केली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमध्ये जय बजरंगबलीचा नाराही दिला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सकाळी १० वाजता न्यू थिप्पासंद्रा येथील केम्पे गौडा पुतळ्यापासून सुरू झाला आणि त्याचा समारोप ब्रिगेड रोडवरील वॉर मेमोरियल येथे दुपारी अडीच वाजता होईल. भाजपाने या रोड शोला ‘नम्मा बेंगळुरू, नम्मा हेम’ (आमचे बेंगळुरू, आमचा अभिमान) असे नाव दिले आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बदामी येथे दुपारी ३ वाजता आणि हावेरी येथे ५ वाजता सभा घेणार आहेत.
रविवारी संध्याकाळी ते नंजनगुड येथील प्रसिद्ध श्रीकांतेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आणि पूजा करून प्रचाराची सांगता करतील. कर्नाटक प्रचारात नरेंद्र मोदींनी आतापर्यंत १४ हून अधिक जाहीर सभा आणि रोड शो केले आहेत.
हे ही वाचा:
‘द केरळ स्टोरी’ पहिल्याच दिवशी सुपरहिट!
सुरक्षा दलाला यश, बारामुल्लामध्ये दहशतवाद्याचा खात्मा
इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्याला हिंदू धर्मगुरूंची उपस्थिती
‘दहशतवादी उद्योगाचे प्रवक्ते’, जयशंकर यांनी बिलावलना सुनावले
२२४ सदस्यीय विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूडबिद्री येथे निवडणूक सभेला संबोधित करताना बजरंग बलीचा नारा दिला होता. तसेच मतदान केंद्रात मत देताना जय बजरंग बली म्हणा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.