केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दिशा सालियन प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने राणे पिता पुत्रांना दिलासा दिला आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा गुन्हा राणे पितापुत्रांविरोधात मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. दिशा सालियनच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी राणे पितापुत्रांची चौकशीही केली होती. राजकीय दबावामुळे आपल्याला गोवल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. आज दिंडोशीतील सत्र न्यायाधीश एस. यू. बघेल यांनी राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय दिला.
हे ही वाचा:
नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन
आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण
आसाम मधील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार काश्मीर फाईल्स पाहण्यासाठी अर्ध्या दिवसांची सुट्टी
दिशा सालियन ही अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी तिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. या प्रकरणात राणे पितापुत्रांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर तब्बल नऊ तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नितेश राणे यांनाही अटक होणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना कोर्टाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. काही अटी आणि शर्तींवर राणे पिता पुत्रांना हा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.