राणांच्या घरात घुसू पाहणाऱ्या शिवसैनिकांना एका दिवसात जामीन

राणांच्या घरात घुसू पाहणाऱ्या शिवसैनिकांना एका दिवसात जामीन

शनिवार, २३ एप्रिल रोजी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांच्या इमारतीबाहेर एकत्र येऊन घोषणाबाजी करत बॅरिगेट्स तोडून आत जाण्यचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी १६ शिवसैनिकांविरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार २४ एप्रिल रोजी १६ शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, एका दिवसात शिवसैनिकांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आले होते. मात्र शिवसेना कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्यांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. राणा दाम्पत्यांच्या इमारतीसमोरील बॅरिगेट्स तोडून शिवसेना कार्यकर्त्यांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांच्या इमारतीसमोर दिवसभर राडा घातला होता.

राणा दाम्पत्यांना शारीरिक इजा पोहचवण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न केला होता. तसेच, राणा दाम्पत्यांच्या इमारतीबाहेर शिवसैनिकांनी रुग्णवाहिका आणली होती. या प्रकरणी खार पोलिसांनी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार १६ शिवसैनिकांना खार पोलिसांनी अटक केली होती. या १६ शिवसैनिकांना एका दिवसात जामिनावर सोडण्यात आले आहे.

हे ही वाचा:

फ्रान्सची सूत्रे पुन्हा मॅक्रोनच्याच हाती

जातीवरून हिणवत छळ केल्याचा नवनीत राणांचा आरोप

सोमय्याप्रकरणी महाडेश्वरांना अटक व जामीन

राणा दाम्पत्यांना एका प्रकरणात दिलासा

राणा दाम्पत्याच्या घरामसोर मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. परंतु, कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचे पठण करणारच यावर राणा दाम्पत्य देखील ठाम होते. राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यापसून शिवसैनिक आक्रमक झाले होते. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बॅरिकेड्‌सवर चढून राणा यांच्या घरापुढे जोरदार घोषणाबाजी केली होती.

Exit mobile version