ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंचा जामीन अर्ज फेटाळला

कर्ज फसवणूक प्रकरणी मालेगाव न्यायालयाने फेटाळला अर्ज

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंचा जामीन अर्ज फेटाळला

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी मालेगाव न्यायालयाने ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज फेटाळला. अद्वय हिरे यांनी यांच्यावरील गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे, त्यामुळे हिरे यांना आता जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा युक्तिवाद नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला.

नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी युक्तिवात करताना सांगितलं की, अद्वय हिरे यांनी घेतलेले ७ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज आज ३२ कोटीपर्यंत पोहोचले आहे. यातील एकही हप्ता हिरे यांनी भरलेला नाही. तसेच ते पैसे ज्या सूत गिरणीसाठी घेतलेले होते पण तिथे न वापरता इतरत्र वापरले म्हणून त्यांच्यावर एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

अद्वय हिरे यांनी रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्यावर ही रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अद्वय हिरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे ३२ कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन आयेशा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता.

हे ही वाचा:

‘मुंबई आता जुनी झाली, बॉलीवूड हैदराबादला जाणार!’

ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक

वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली

पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याने काश्मीरच्या विद्यार्थ्यांना अटक

दरम्यान, बँकेची ही केस सुमारे आठ वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. सुरुवातीपासूनच आम्ही न्यायालयीन लढाई लढत असून न्यायव्यवस्थेचा पूर्ण विश्वास असल्याचे डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

Exit mobile version