नितेश राणेंना दिलासा नाहीच! सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

नितेश राणेंना दिलासा नाहीच! सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

सिंधुदुर्ग न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. संतोष परब मारहाण प्रकरणात नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन सातपुते याने पोलिस चौकशी दरम्यान नितेश राणे यांचे नाव घेतल्यामुळे राणे हे अडचणीत आल्याचे म्हटले जात होते. तेव्हापासून नितेश राणे हे नॉट लिचेबल झाले असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात अर्ज केला होता. पण सिंधुदुर्ग न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे संतोष परब प्रकरणात नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार पाहायला मिळत आहे.

पण असे असले तरीही नितेश राणे यांना उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असून ते उच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजत आहे. तर जोवर उच्च न्यायालयाचा या संदर्भातील निकाल येत नाही तोवर नितेश राणे यांना पोलिसांसमोर हजर होण्याची आवश्यकता नसल्याचेही सांगितले जात आहे. नितेश राणे यांचे वकील ॲड. संग्रम देसाई यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग न्यायालयाच्या निकालाची संपूर्ण प्रत अजून आली नसली तरीदेखील पोलिसांना नितेश राणेंकडून त्यांचे मोबाईल हवे आहेत. चौकशीसाठी हे मोबाईल आवश्यक असल्याने कोर्टाने राणे यांना जामीन नाकारला आहे.

हे ही वाचा:

‘आम्ही २० करोड मुसलमान…’ नसिरुद्दीन शहांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड

‘मुघल हे तर राष्ट्र निर्माते!’ नासिरुद्दीन शहांचा जावई शोध

‘राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापण्याची मोदींची इच्छा होती!’ पवारांची नवीन पुडी

 

नारायण राणेंना सिंधुदुर्ग पोलिसांनी बजावलेली नोटीसच बेकायदेशीर

दरम्यान या सर्व प्रकरणात राणे यांच्या विरोधात निकाल लागल्याने शिवसेना जल्लोष साजरा करताना दिसत आहे. कणकवलीमध्ये शिवसेना शाखांवर शिवसैनिक जमा होत असून फटाके फोडून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

Exit mobile version