अशा भ्याड हल्ल्याने बहुजन समाज घाबरणार नाही

अशा भ्याड हल्ल्याने बहुजन समाज घाबरणार नाही

भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा दगडफेक केलेल्या आरोपीसोबतचा फोटो ट्विट करुन राष्ट्रवादीवर आसूड ओढला आहे.

“प्रस्थापितांनी बहुजनांवर हल्ला केलाय. पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे, ना उद्याही दबेल. घोंगडी बैठका सुरूच राहणार.” असं ट्विट करत पडळकरांनी राष्ट्रवादीला ललकारलं आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेरात कैद झाला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून संबंधिताने तिथून पळ काढला. पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही. सोलापुरातील श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे ही घटना घडली.

“माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझं शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहलं आहे”, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला.

हे ही वाचा:

पडळकरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर भाजपा नेते आक्रमक

ठाकरे सरकारची उर्दू ‘हौस’

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

संकटात असलेल्या कोकणी माणसाची थट्टा थांबवा

“मी शरद पवारांवर काय टीका केली होती… मग मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?”, असा प्रतिप्रश्न पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. बहुजनांना जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं पडळकर म्हणाले.

Exit mobile version