भाजपा अस्तित्वात आहे तोवर, बदरुद्दीन अजमल आसामची ओळख बनू शकणार नाही

भाजपा अस्तित्वात आहे तोवर, बदरुद्दीन अजमल आसामची ओळख बनू शकणार नाही

आज केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामच्या दिसपूर येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस-एआययुडीएफच्या युतीवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राहूल गांधी यांच्या बद्रुद्दीन अजमल याला खांद्यावर घेऊन सीमा उघडण्याच्या वक्तव्यांवर देखील सडकून टिका केली. “भाजपा अस्तित्वात आहे तोपर्यंत बद्रुद्दीन अजमल आसामची ओळख बनू शकत नाही.” असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सभेत बोलताना ते म्हणाले, “राहुल बाबांचा अजेंडा बद्रुद्दीन अजमलला खांद्यावर घेऊन नाचण्याचा आहे. अजमल सारखे नेते असलेले सरकार घुसखोरी रोखू शकणार आहे का? तो सीमांच्या चाव्यांवर लक्ष ठेवून आहे. अजमल, दिवास्वप्न का पाहतोस तुला चाव्या मिळणार नाहीत.”

हे ही वाचा:

‘जनाबसेने’चे हिंदुत्व ‘टक्केवारी’च्या लाटेत वाहून गेले आहे

अनिल देशमुख यांच्या विरोधातील चौकशी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक

केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटी परतावा

नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास बाबात बोलताना ते म्हणाले की काँग्रेस लोकांमध्ये फुट पाडू पाहत आहे आणि त्यांना विविध कारणांवरुन भांडायला भाग पाडत आहे. कामरुप येथे बोलताना अमित शाह म्हणाले की, “काँग्रेस लोकांना बोडो-नॉन बोडो, आसामी-बंगाली, हिंदु-मुस्लिम, अप्पर आसाम- लोअर आसाम, आदिवासी-आदिवासी नसलेले अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोकांमध्ये फुट पाडून त्यांच्यात भांडणे लावत आहे. नरेंद्र मोदींची घोषणा, सबका साथ सबका विकास आहे.”

त्यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या योजनेत आदिवासी, अल्पसंख्यांक आणि बोडोंचा समावेश करून ₹१०,००० देण्याचे आश्वासन देखील दिले.

“जेव्हा आम्ही प्रत्येक घरी पाणी पोहोचवू तेव्हा ते मुसलमानांच्या घरीही पोहोचेल. अल्पसंख्यांना देखील घरे मिळतील. त्याबरोबरच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीत अल्पसंख्यांक, आदिवासी आणि बोडोंना देखील ₹१०,००० दिले जातील.”

आसाममधील निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याला १ एप्रिल सुरूवात होईल. भाजपा या निवडणुकीत आसाम गण परिषद आणि युनायटेड पिपल्स पार्टी लिबरल (युपीपीएल) या पक्षांसोबत उतरली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रन्ट (एआययुडीएफ) आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट- लेनिनीस्ट) लिबरेशन, अंचालिक गण मंच आणि बोडोलँड पीपल्स फ्रन्ट यांच्यासोबत युती केली आहे.

Exit mobile version