27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणबच्चू कडूंच्या पक्षाचा ठाकरे सरकारला पुन्हा घरचा आहेर

बच्चू कडूंच्या पक्षाचा ठाकरे सरकारला पुन्हा घरचा आहेर

Google News Follow

Related

राज्यात सध्या विविध विषयांवरुन राजकारण तापलं असताना महाविकास आघाडीत देखील मतमतांतरं असल्याचं समोर येत आहे. महाविकास आघाडीचे नेते जरी सर्व काही आलबेल असल्याचं सांगत असले तरी या आघाडीचे घटक असलेले लोकप्रतिनिधी उघड नाराजी बोलून दाखवत आहेत. आता राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आम्ही महाविकास आघाडीत असूनही आमच्यावर अन्याय होतोय असा गंभीर आरोप केला आहे.

सत्तेत सहभागी असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आमदार राजकुमार पटेल यांनी  महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना मान दिला जात नसल्याची खंतही बोलून दाखवली. मेळघाट मतदार संघातील  आमदार राजकुमार पटेल यांची पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. नुकतेच चिखलदरा येथे पोलीस विश्रामगृहाचं उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले.

यावेळी स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांना निमंत्रण न दिल्याने ते आता अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी यांच्या विरोधात हक्क भंग दाखल करणार आहेत, असं त्यांनीच सांगितलं.  राज्यमंत्री बच्चू कडू, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यासोबतही असंच डावलण्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक आरोपही आमदार पटेल यांनी केला आहे.

हे ही वाचा:

आरोग्य क्षेत्राचे बजेट दुप्पट केले

विधानसभा अध्यक्षपद निवडीच्या हालचालींना वेग

दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?

गुलशन कुमारचा मारेकरी अब्दुल रौफ कोणत्याही दयेच्या लायक नाही

त्यामुळे महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे हे स्पष्ट झालं आहे. या सगळ्या प्रकरणी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी यांनी सांगितले की, चिखलदऱ्यात झालेला कार्यक्रम हा छोटेखानी असल्याने त्याची पत्रिकाही छापली नाही आणि तरीही मी आमदार राजकुमार पटेल यांना या कार्यक्रमासंदर्भात कॉल देखील केला होता, पण त्यांनी उचलला नाही, असं त्यांनी सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा