अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे नेहमीच चर्चेत असतात. बच्चू कडू यांनी केलेल्या नव्या विधानामुळे ते अडचणीत आलेलं दिसत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार कडू यांनी या वक्तव्याची सध्या दिल्ली आणि आसाममध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बच्चू कडूंच्या वक्तव्यामुळे आसाम विधानसभेत गोंधळ उडाला. त्याचबरोबर आसाममधील विरोधी पक्षांच्या आमदारांनीही बच्चू कडूंच्या अटकेची मागणी केली आहे.आसाममध्ये आमदारांनी बच्चू कडू यांच्या ‘कुत्रा’ वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातखळकर यांनी भटक्या कुत्र्यांवरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर सुरु असलेल्या चर्चेमध्ये अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आसामबाबत वादग्रस्त विधान केले होते. महाराष्ट्रातील सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवावेत असे वादग्रस्त विधान केले होते . महाराष्ट्रातील सर्व भटके कुत्रे आसामला पाठवा, असे कडू म्हणाले होते. तिथे त्यांची किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्याचे मांस खातात. तिथले लोक कुत्र्याचे मांस खातात जसे आपण हरण खातो. या कुत्र्यांची खरेदी-विक्री केली जाईल. गुवाहाटीला गेल्यावर आम्हाला याची माहिती मिळाली.
हे ही वाचा:
दाऊदचा मुलगा दुबईत पार्टीला आला होता?
राज्यातील शेतकऱ्यांना १२ तास वीज देणार
जेष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन
माधुरी दीक्षित यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन
आसाम विधानपरिषदेत गदारोळ
बच्चू कडू यांच्या विधानानंतर आसामच्या विधान परिषदेत मोठा गदारोळ उडाला . राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी केल्याने कटारिया यांना १५ मिनिटांत आपले भाषण संपवावे लागले. काँग्रेसचे आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी हा मुद्दा उपस्थित केला.आसामबाबत असे वादग्रस्त वक्तव्य दिल्यानंतर सरकार यावर गप्प का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, विरोधी पक्षाच्या आमदारांनीही कडू यांच्या अटकेची मागणी केली आहे.
बच्चू कडू यांची सारवासारव
आसाम विधानसभेत बच्चू कडू यांच्या अटकेची मागणी विरोधकांनी केली. वादग्रस्त विधानानंतर बच्चू कडू यांनी आता सारवासारव केली आहे कडू म्हणाले, “मला आसामचे नव्हे तर नागालँडचे नाव द्यायचे होते. माझ्या वक्तव्यामुळे आसामच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो.