पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजप खासदार यांनी राजकीच संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता भाजपला रामराम ठोकत त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ‘माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियो आज राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल परिवारात सहभागी झाले’, असं ट्वीट तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे.
बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला होता. बाबुल सुप्रियो आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले होते की, राजकरणात न राहता देखील ते सामाजिक कार्य करू शकतात. ते कोणत्याही पक्षात जाणर नाहीत असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता त्यांच्या टीएमसी प्रवेश झाल्यानं भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे.
गेल्या काही दिवसापासून बाबुल सुप्रियो भाजपमध्ये फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत अनेक प्रश्न केले जात होते. ते काही तरी मोठा निर्णय घेतील असं बोललं जात होतं. त्यांनी फेसबुक पोस्टवरून त्यांच्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. पक्षासोबत आपले काही मतभेद होते. निवडणुकीपूर्वीच या गोष्टी सर्वांच्या समोर उघड झाल्या होत्या. पराभवाची मीही जबाबदारी घेत आहे. परंतु, त्याला दुसरे नेतेही जबाबदार आहेत, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
हे ही वाचा:
टी २० वर्ल्डकपनंतर कुंबळे प्रशिक्षकपद स्वीकारणार?
अमेरिकेने मागितली ड्रोन हल्ल्याबाबत माफी
पश्चिम बंगाल पोलिसांना स्थानिकांशी गैरवर्तन महागात पडले
बीकेसी पूल दुर्घटनेवरील चर्चा थांबवण्यासाठी युतीची पुडी सोडली