दिल्लीतील जंतरमंतर येथे काही दिवसापासून लैंगिक शोषणाचा आरोप करत बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिकसहीत ३० कुस्तीपटू धरणे आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी जंतर मंतर येथे पोहोचल्या होत्या. प्रियांका गांधींसोबत त्यांचे पर्सनल सेक्रेटरीही होते. मात्र सोबत आलेल्या सेक्रेटरीवर महिलेचा विनयभंग केल्याचा आणि दलित महिलेला दोन पैशांची महिला असे म्हटल्याचा आरोप असल्यामुळे कुस्तीगीर बबिता फोगटने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खरमरीत सवाल उपस्थित केला.
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या निषेधात सामील झालेल्या नेत्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगट यांनी शनिवारी सांगितले की, राजकीय नेत्यांनी राजकारणासाठी व्यासपीठाचा गैरवापर करू नये. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी शनिवारी जंतरमंतर पोहोचल्या तेव्हा राजकीय नेत्यांनी मंचाचा गैरवापर केल्याचा वापर बबिता फोगट यांनी केला आहे. तिने ट्विटरवर लिहिले की, महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रियांका वढेरा त्यांचे पर्सनल सेक्रेटरी संदीप सिंह यांच्यासोबत जंतरमंतरवर पोहचल्या आहेत, मात्र या व्यक्तीवरच महिलांचा विनयभंग आणि एका दलित महिलेला दोन पैशांची महिला म्हटल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
…तर बृजभूषण सिंह राजीनामा देण्यास तयार
युक्रेनच्या अनेक शहरांवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांत २५ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील १९ नागरिक सुदानमधून सुखरूप परतले
महाराष्ट्रातील १९ नागरिक सुदानमधून सुखरूप परतले
बबिता पुढे सांगते, आमच्यासारखे खेळाडू जे तळापासून वरपर्यंत पोहचले आहेत, ते स्वतःच्या लढाया लढण्यास सक्षम आहेत. त्यामुळे व्यासपीठाचा राजकीय हेतूने दुरुपयोग करू नये. तसेच काही नेते कुस्तीपटूंच्या व्यासपीठाचा गैरवापर करून आपली राजकीय कारकीर्द चमकवत आहेत. खेळाडूंनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण संपूर्ण देशाचे आहोत.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कुस्तीपटूंची भेट घेतल्यानंतर बबिता फोगट यांचे विधान आले. कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (wfi)चे प्रमुख आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अल्पवयीन मुलींसह अनेक महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे, हा आरोप सिंह यांनी ठामपणे नाकारला आहे.
दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात बृजभूषण सिंह यांच्या विरोधात पोक्सो कायद्यासह लैंगिक शोषणाचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. मला पंतप्रधानांकडून कोणतीही अपेक्षा नाही, कारण जर त्यांना या कुस्तीपटूंबद्दल काळजी वाटत असेल, तर त्यांनी त्यांच्याशी अद्याप चर्चा का केली नाही किंवा त्यांना भेटले नाही. सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत आहे, असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला.