सलमान खुर्शीद यांनी केलेली हिंदुत्वाची तुलना ही अतिशयोक्ती

सलमान खुर्शीद यांनी केलेली हिंदुत्वाची तुलना ही अतिशयोक्ती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकातील एका परिच्छेदाशी असहमती दर्शवली. जिथे खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस, बोको हराम सारख्या दहशतवादी संघटनांशी केली.

दिल्लीचे दोन वकील विवेक गर्ग आणि विनीत जिंदाल यांनी सलमान खुर्शीद यांच्याविरोधात हिंदुत्वाची बदनामी केल्याच्या तक्रारी दिल्ली पोलिसांकडे दाखल केल्या आहेत.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ हे पुस्तक आहे. बुधवारी पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यात काँग्रेस नेते पी चिदंबरम, दिग्विजय सिंह आदी उपस्थित होते.

आझाद म्हणाले, “हिंदुत्व ही राजकीय विचारधारा म्हणून आम्ही सहमत असू शकत नाही, परंतु त्याची आयएसआयएस आणि जिहादी इस्लामशी तुलना करणे हे चुकीचे आणि अतिशयोक्ती आहे.” असे आझाद म्हणाले.

हे ही वाचा:

न्यूझीलंडविरुद्ध भारताची टीम घोषित, कोण आहे नवीन कर्णधार?

खासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप

उपरती झाली; स्वा. सावरकर यांचे नाव संमेलन गीतात समाविष्ट

खुर्शीद यांच्या पुस्तकातील एक उतारा असा आहे, “ऋषी आणि संतांना ज्ञात असलेला सनातन धर्म आणि अभिजात हिंदू धर्म हिंदुत्वामुळे बाजूला ढकलला जात आहे, सर्व मानकांनुसार, अलीकडील आयएसआयएस आणि बोको हराम सारख्या गटांच्या जिहादी इस्लामप्रमाणेच हिंदुत्व आहे. खुर्शीद यांच्या पुस्तकातील द सॅफरॉन स्काय नावाच्या भागात हा उल्लेख आहे. भाजपनेही खुर्शीद यांच्यावर टीकास्त्र सोडले असून काँग्रेसने त्यांना पक्षातून काढून टाकावे अशी मागणी केली आहे.

Exit mobile version