उत्तर प्रदेश सरकारने फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या असे नामकरण करून तीन वर्ष झाल्यानंतर, तेथील रेल्वे स्थानकालाही आता अयोध्या असे नाव देण्यात आले आहे. “यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद रेल्वे जंक्शनचे नाव बदलून अयोध्या कॅंट (कॅंटोन्मेंट) करण्याचा निर्णय घेतला आहे.” मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) शनिवारी एका ट्विटमधून ही माहिती दिली.
#UPCM श्री @myogiadityanath जी ने फैजाबाद रेलवे जंक्शन का नाम "अयोध्या कैन्ट" करने का निर्णय लिया है। @spgoyal@sanjaychapps1@74_alok pic.twitter.com/P8qg4Gc2P3
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) October 23, 2021
उत्तर प्रदेश सरकारने हाती घेतलेला हा आणखी एक नाव बदलण्याचा निर्णय आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर फैजाबादचे अयोध्या असे नामकरण करण्याबरोबरच, भाजपा सरकारने त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले. त्याचप्रमाणे, जून २०१८ मध्ये, मुगलसराय रेल्वे स्थानकाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) विचारवंत दीनदयाल उपाध्याय यांच्या नावावर नामकरण करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील अनेक गटांनी इतर जिल्ह्यांची नावे बदलण्याची मागणीसुद्धा केली आहे. यामध्ये आझमगढ ते आर्यमगड, अलीगढ ते हरिगढ, आग्रा ते अग्रवन अशा नावांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
‘या’ राज्यात काँग्रेस सरकार करणार मदरशांचा ९० टक्के खर्च
काय आहे भारताची ‘अभ्यास’ मिसाईल?
दुबई-जम्मू-काश्मीर करार हे भारतासाठी मोठे यश
…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन
वर्षानुवर्षे मुघल आणि इस्लामिक साम्राज्यांचा भाग राहिलेल्या उत्तरप्रदेशमध्ये अनेक जिल्ह्यांची आणि शहरांची नावं ही कालांतराने आक्रमकांच्याच नावाने ठेवली गेली. २०१७ साली योगी सरकार सत्तेत आल्यानंतर या जिल्ह्यांचीच आणि शहरांची नावं पुन्हा बदलून मूळ हिंदू नावं बहाल करण्याची मोहीम योगी सरकारने हाती घेतली आहे.