कॉर्डिलिया क्रूझप्रकरणात सध्या चर्चेत असलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिल्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड खवळले आहेत. सांभाळून बोला, जुना इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है, असा इशारा आव्हाड यांनी रेडकरना दिला आहे. हा इशारा त्यांनी नेमका कशाच्या अनुषंगाने दिला आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गेले काही दिवस समीर वानखेडे यांच्यावर पत्रकार परिषदांमधून आरोपांची मालिका सुरू केली आहे. त्यावर वानखेडे कुटुंबीयही प्रत्युत्तर देत आहेत. बुधवारी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक हे सत्तेचा गैरवापर करत असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. त्यावर आव्हाड यांनी क्रांती रेडकरना सांभाळून बोलण्याचा आणि इतिहास काढावा लागला तर हमाम मे सब नंगे असल्याचे सगळ्यांच्या लक्षात येईल, असे उत्तर दिले आहे.
‘क्रुझवर ४ हजार लोक होते. मात्र, त्यातील फक्त ६ जणांनाच पकडलं, हे काही कळलं नाही, असंही आव्हाड म्हणत आहेत.
हे ही वाचा:
साईल, गोसावीची वाट पाहाताहेत एनसीबीवाले!
चीनच्या नव्या सीमा कायद्यावर भारत नाराज
नवाब मलिक, न्यायालयात पुरावे सादर करा!
नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्या
नवाब मलिकांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवे आरोप केले होते. त्यात वानखेडे यांच्या निकाहनाम्याच्या व्हायरल केलेल्या फोटोबद्दल सांगितले. त्यावर बोलताना क्रांती रेडकर म्हणतात की, निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र माझा नवरा आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते, आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो” असं क्रांती रेडकर म्हणाली.