ऑस्ट्रेलियात सत्तांतर! ऍन्थनी अल्बनीज होणार नवे पंतप्रधान

ऑस्ट्रेलियात सत्तांतर! ऍन्थनी अल्बनीज होणार नवे पंतप्रधान

शनिवार, २१ मे रोजी ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये सत्तापालट पाहायला मिळाला आहे. तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर ऑस्ट्रेलियात लिबरल पक्षाचे शासन संपुष्टात आले असून विरोधी पक्ष असणारा लेबर पक्ष सत्तारूढ होत आहे. या निकालामुळे ऑस्ट्रेलियामध्ये नवीन पंतप्रधान हे लवकरच शपथ घेताना दिसतील. स्कॉट मॉरिसन हे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार असून ऍन्थनी अल्बनीज हे ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान असणार आहेत ऍन्थनी अल्बनीज ऑस्ट्रेलियाचे ३१ वे पंतप्रधान असणार आहेत. १९९६ पासून ऑस्ट्रेलियात खासदार म्हणून कार्यरत आहेत. तर आत्ता ते ऑस्ट्रेलियन संसदेतील विरोधी पक्ष नेते पण होते.

लेबर पक्ष आणि ऍन्थनी अल्बनीज यांच्या विजयासाठी मावळते पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीदेखील शुभेच्छा दिले आहेत. “आज मी विरोधी पक्षाचे नेते आणि होऊ घातलेले पंतप्रधान ऍन्थनी अल्बनीज यांच्याशी बोललो असून त्यांचे निवडणुकीतील यशासाठी अभिनंदन केले आहे” असे मॉरिसन यांनी म्हटले आहे. तर आपण लिबरल पक्षाचे नेते म्हणून पायउतार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार आले ताळ्यावर; पेट्रोल २.६ रुपयांनी तर डिझेल १.४४ रुपयांनी स्वस्त

पश्चिम बंगालच्या तृणमूल उमेदवार निघाल्या बांगलादेशी नागरिक

हट्टाने उत्तर प्रदेशला गेलो असतो तर मनसैनिक सापळ्यात अडकले असते!

राज यांचा शरद पवारांना टोमणा आणि मोदींना विनंती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ऍन्थनी अल्बनीज यांचे अभिनंदन केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी अल्बनीज यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाच्या विजयाबद्दल, आणि पंतप्रधान पदी झालेल्या आपल्या निवडीबद्दल अभिनंदन! आपली सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातल्या सामायिक प्राधान्यांसाठी काम करायला मी उत्सुक आहे.”

Exit mobile version