अबू आझमींना आला औरंगजेबाचा पुळका

अबू आझमींना आला औरंगजेबाचा पुळका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाय उतार होत असताना घाईघाईत घेतलेल्या निर्णयामध्ये औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याचा समावेश होता. मूळात ठाकरे सरकार बहुमतात नसल्यामुळे या निर्णयाला अधिकृतता मिळू शकली नाही. सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर अशी अधिकृत घोषणा केली. नामांतराचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारकडे गेला आहे. पण सध्या नामांतराचा मुद्दा गाजतोय. एमआयएम पक्षाचे नेते यांनी नामांतरा विरोधात आंदोलन आणि मोर्चा काढण्याची धमकी दिली आहे. त्याला उत्तर देताना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे यांनी स्वत:च्या मुलाचे नाव आधी औरंगजेब ठेवा, असा खोचक सल्ला जलील यांना दिला. तर आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब वाईट राजा नव्हता. त्यांचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाही असे अजब विधान केले. आझमी यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मिडियावर चर्चा होत आहे.

ज्या औरंगजेबाने मराठवाड्यावर अन्याय केला, तेथील लोकांना त्रास दिला. त्याचा इतका पुळका येण्याचे कारण काय ? औरंगजेब नाव चांगले असेल तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव औरंगजेब असे का ठेवत नाही असा टोला दानवे यांनी जलील यांना लगावला होता.संपूर्ण संभाजीनगरमध्ये मुसलमान समाजातील एकाही मुलाचे नाव औरंगजेब नाही. प्रथम स्वत:च्या मुलांची नावे औरंगजेब ठेवायला प्रारंभ करा, मग आमच्या गावाला औरंगाबाद म्हणा असं विधानही दानवे यांनी केलं होतं.

हे ही वाचा:

अग्रलेख लिहिणारे डुप्लिकेट संजय राऊत आहेत का?

१५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार

म्हाडा, आरोग्य भरती आणि टीईटी, या प्रकरणांचा तपास ईडीकडे

सुवर्णपदक हुकलेल्या पूजा गेहलोतला पंतप्रधान मोदींनी दिले प्रोत्साहन

अनेकांची औरंगजेब नावे

दानवे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अबू आझमी म्हणाले की, औरंगाबादमध्ये देखील अनेकांची औरंगजेब अशी नावे आहेत. ३६ जिल्ह्यांत तीन नावे उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद अशी मुस्लिम आहेत. औरंगजेब बादशहा वाईट राजा नव्हते, त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय असे ते म्हणाले.

Exit mobile version