शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत हे एका महिलेशी बोलत असताना आक्षेपार्ह भाषेत बोलताना ऐकू येत आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, ही ऑडिओ क्लिप शिवसेना खासदार संजय राऊत यांची आहे. ७० सेकंदांचा ऑडिओ असलेली ही क्लिप व्हायरल झाली असून, त्यात एक महिला आणि संजय राऊत यांचा संवाद सुरू आहे. यावेळी या क्लिपच्या शेवटी राऊत यांनी महिलेला जमिनीची कागदपत्रे देण्यास सांगितले असून त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.
Is this really you, @rautsanjay61? Threatening a woman? @NCWIndia please investigate @SmritiIraniOffc @smritiirani pic.twitter.com/TocvzkWh2C
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) July 30, 2022
हे ही वाचा:
धनुष्यातील ‘बाणा’सोबत ‘अर्जुन’ही शिंदेंसोबत
राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी
बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने
मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द
ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही अनेकदा संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करतानाही संजय राऊत यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. तर अभिनेत्री कंगना रानौत हिच्यावर टीका करतानाही आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यावरूनही संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली होती.