…आणि काश्मीर फाइल्समुुळे काश्मिरी पंडितांना अश्रु अनावर

…आणि काश्मीर फाइल्समुुळे काश्मिरी पंडितांना अश्रु अनावर

काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवर आधारित द काश्मीर फाइल्स या फिल्मविरोधात काही आवाज उमटत असले तरी या फिल्मच्या प्रेमात पडलेल्यांची संख्या त्यापेक्षाही मोठी आहे. जम्मूत या फिल्मच्या झालेल्या विशेष शोदरम्यान थिएटरमध्ये लोक अक्षरशः ओक्साबोक्शी रडताना दिसून आले. यासंदर्भातील एक व्हीडिओ चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

या फिल्मचा पहिला शो पाहण्यासाठी थिएटरमध्ये आलेल्या दोन महिला भावनाविवश झालेल्या या व्हीडिओत दिसतात. या फिल्मचे निर्माते व कलाकारांनी म्हटले आहे की, काश्मीरी पडिंतांना काश्मीरमधून हुसकावून लावण्याचा दुर्दैवी आणि वेदनादायक इतिहास या फिल्ममुळे लोकांपुढे मांडला जाईल.

या व्हीडिओत दिसते की, थिएटरमध्ये जमलेल्या चाहत्यांना अश्रु आवरत नाहीत. एकीकडे आपल्या अश्रुंनी चित्रपटाला पोचपावती देतानाच हे चाहते टाळ्या वाजवूनही चित्रपटाचे कौतुक करत आहेत.

या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांचा अभिनय पाहायला मिळतो. चित्रपट समीक्षक गिरीश जोहार यांनी हा थिएटरचा व्हीडिओ शेअर केला असून पॉवर ऑफ ट्रू सिनेमा असा मथळाही त्याला दिला आहे.

हे ही वाचा:

Exit poll : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचाच डंका

तब्बल ३८ वर्षांनंतर प्रशासकाकडे मुंबई महापालिकेचा पदभार

रशियाच्या हल्ल्यात हॉस्टोमेलचे महापौर ठार

मंगळवारी संजय राऊत यांची पत्रकार परिषद; यावेळी प्रश्नोत्तरे होणार का?

 

या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतात की, काश्मीर समस्येवरील तोडगा आणि राजकारण यांच्या संबंध जोडण्याची गरज नाही.

दरम्यान, कपिल शर्मा शोमध्ये मात्र विवेक अग्निहोत्री व या चित्रपटातील अन्य कलाकारांना बोलावण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याची खूप चर्चा झाली. या चित्रपटामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या असे सांगत एकाने न्यायालयात धाव घेतली आहे.

Exit mobile version