समीर वानखेडे हे नेमके मागासवर्गीय की मुसलमान हा वाद आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर हे मुंबई येथे वानखेडे कुटुंबाच्या भेटीला आले आहेत. यावेळी वानखेडे कुटुंबीय अरुण हलदर यांच्याकडे सर्व घटनाक्रम आणि आपली कैफियत मांडत आहेत. तर आपले मागासवर्गीय असल्याची सर्व कागदपत्र वानखेडे कुटुंबीयांनी अरुण हलदर यांना दाखवली आहेत.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात कारवाई केल्यापासून एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी मोर्चा उघडला आहे. आल्या दिवशी नवाब मलिक वानखेडे कुटुंबीयांवर आरोप करत असून वानखेडे कुटुंब मुसलमान असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे नसून दाऊद वानखेडे आहे असे त्यांनी म्हटले आहे. तर खोटे जात प्रमाणपत्र सादर करून समीर वानखेडे यांनी फसवणूक करून नोकरी मिळवली असेही मलिक यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘कुणाचा नवरा हिंदू की मु्स्लिम याचे नवाब मलिक आणि मीडियाला काय देणेघेणे?’
प्रसिद्ध झाला!! ‘न्यूज डंका’चा पहिलावहिला दिवाळी अंक ‘सुशासन पर्व’
मलिक यांचे आरोप आजवर वानखेडे कुटुंबीयांनी अनेकदा फेटाळले असून सर्व कागदपत्र माध्यमांसमोर दाखवत आपण मागासवर्गीय असल्याचे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी जाहीर केले. तर मी दाऊद वानखेडे नाहीतर ज्ञानदेव वानखेडे असल्याचेही त्यांनी सांगितले. याच संबंधी आज रश्यारीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर हे वानखेडे कुटुंबियांच्या भेटीला आले होते. या वेळी समीर वानखेडे, त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे, बहीण जस्मिन वानखेडे आणि पत्नी क्रांती रेडकर वानखेडे हे उपस्थित होते. हलदर यांनी वानखेडे कुटुंबाशी चर्चा करून त्यांच्याकडील कागदपत्रांचीही पाहणी केली आहे.