विधानसभा निवडणूक यंदा एकाच टप्प्यात होणार असून यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीकडून कांदिवली पूर्व या जागेसाठी भाजपा नेते अतुल भातखळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
अतुल भातखळकर यांनी प्रभात प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी कांदिवली पूर्वेतील वार्ड क्र. २४ येथील प्रमोद नवलकर मैदान उद्यानात येणाऱ्या नागरिकांची भेट घेतली. उपस्थित नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी अतुल भातखळकर यांच्यासोबत माजी नगरसेवक शिवकुमार झा, विधानसभा महामंत्री संजय जायसवाल, वार्ड अध्यक्ष रमन मिश्रा देखील उपस्थित होते.
दरम्यान, कांदिवली पूर्वचे उमेदवार अतुल भातखळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभात शाखेतही सहभागी झाले. यावेळी भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभात शाखेत जाण्याचा योग आज पहाट प्रचारामुळे आला. भगव्या ध्वजासमोर नतमस्तक झालो. प्रणाम केला. स्वयंसेवकांशी गाठभेट कायम ऊर्जा आणि तजेला देणारी असते. ऊर्जेचे गाठोडे घेऊन पुढच्या प्रचाराला निघालो.”
रा.स्व.संघाच्या प्रभात शाखेत जाण्याचा योग आज पहाट प्रचारामुळे आला. भगव्या ध्वजासमोर नतमस्तक झालो. प्रणाम केला. स्वयंसेवकांशी गाठभेट कायम ऊर्जा आणि तजेला देणारी असते. ऊर्जेचे गाठोडे घेऊन पुढच्या प्रचाराला निघालो. pic.twitter.com/HMko6mopAW
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 26, 2024
हे ही वाचा..
फटाके फोडण्यावरून भिलवाडामध्ये हिंसाचार
बांगलादेशमध्ये सनातन जागरण मंचची भव्य रॅली
महायुती अमित ठाकरेंना समर्थन देणार?
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण, सीरिया, इराकचे हवाई क्षेत्र बंद!
यासोबतच दुपारी अतुल भातखळकर यांनी पदयात्रा काढली. ही पदयात्रा प्रमोद नवलकर उद्यान (काला पत्थर) गार्डनपासून जानिया कंपाउंड, चौहान चाळ, कैलाशपुरी चाळ, विश्वकर्मा मंदिर, रहाटे चाळ, ओंकार सिंह चाळ, पांडेय मिश्रा चाळ, पंडित दीनदयाल मैदान, सत्तार चाळ, पांडेय चाळ, आदर्श नगर, दुबे चाळ, शिवाजी मैदान येथे काढण्यात आली. या पदयात्रेला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. दरम्यान नागरिकांनी अतुल भातखळकरांना त्यांच्या तिसऱ्या विजयासाठी आशीर्वाद दिले. विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणूक प्रचारासाठी प्रभात प्रचाराचा कार्यक्रम ठरवला असून ते कांदिवली पूर्वेतील विविध मैदानात सकाळी योग, व्यायाम आणि खेळासाठी येणाऱ्या नागरिकांची भेट घेणार आहेत.