कोरोनाकाळात राज्यातील सर्वच क्षेत्रांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले. विस्कळीत झालेली आर्थिक घडी सुरळीत होत असतानाच अगोदर मुंबई, कोकण आणि आता मराठवाडा, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केसरी शिधापत्रिका धारकांना नाममात्र दराने तेल, साखरसह आदी धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
राज्यातील जनतेची किमान
दिवाळी तरी गोड करा…
केसरी शिधापत्रिकाधारक परिवारांना तेल, साखरेसह इतर धान्य नाममात्र दराने उपलब्ध करून द्या, अशी मागणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. pic.twitter.com/6DImKcCYvh— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 12, 2021
कोरोनाच्या काळात एका रुपयाची सुद्धा मदत न करणाऱ्या ठाकरे सरकारने किमान आता तरी राज्यातील जनतेची दिवाळी गोड करावी, याकरिता सर्व केसरी शिधापत्रिका धारक परिवारांना तेल, साखर सह इतर धान्य नाममात्र दराने उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशभरातील सुमारे ८० कोटी नागरिकांना गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून वर्षभर मोफत अन्नधान्य देण्याचे काम करण्यात आले. देशभरातील लोकांची गरज लक्षात घेता केंद्र सरकारने पूर्वी एक वर्षासाठी असलेली हि योजना आता दिवाळी पर्यंत वाढवली आहे.
हे ही वाचा:
लग्नाच्या मंगल कार्यालयात सुरू होते हे ‘अमंगल’ कार्य!
… म्हणून ऐरोली खाडीतले मासे मृत पावले!
‘साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही, आज शेतकरी खरा भिजला आहे’
‘स्वातंत्र्यसैनिकांच्या घरी जाऊन पेन्शन पोहोचवा!’
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी राज्यातील सात कोटी नागरिकांना राज्य सरकारकडून एका महिन्याचे धान्य मोफत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, परंतु केंद्र सरकारकडून गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून झालेल्या धान्य पुरवठ्यामुळे राज्य सरकारने घोषणा करूनही मोफत धान्य वाटप केले नाही. कोरोनाच्या काळात एका रुपयाचे सुद्धा पॅकेज जाहीर न करणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यात झालेल्या अतिवृष्टी नंतरही शेतकऱ्यांना किंवा नुकसानग्रस्त नागरिकांना कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. किमान आतातरी आपल्या राज्याची तिजोरी मोकळी करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला मदत करावी अशीही मागणी आमदार भातखळकर यांनी पत्रातून केली आहे.