अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक! ८३ हजारांच्या मताधिक्क्याने दणदणीत विजय

भाजपाचा बालेकिल्ला असलेला कांदिवली पूर्व मतदार संघ अभेद्य

अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक! ८३ हजारांच्या मताधिक्क्याने दणदणीत विजय

कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आणि भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा विजय झाला असून त्यांनी ८३ हजार मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. अतुल भातखळकरांनी विजयाची हॅट्रिक मिळवत कांदिवली पूर्व मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे.

अतुल भातखळकर यांनी विधानसभेतील विजयासाठी सर्व मतदारांचे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. हा विजय जनतेचा आहे असं सांगत अतुल भातखळकरांनी जनतेला स्वतःच्या विजयाचे श्रेय दिले आहे. विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भारण्यापासूनच अतुल भातखळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाची खात्री दिली होती. जास्तीत जास्त मताधिक्याने निवडणून येणं हे लक्ष्य त्यांनी सुरुवातीपासूनचं ठेवले होते.

लोकसभा निवडणुकीवेळी कांदिवली पूर्वने स्पष्टपणे ७३ हजारांचे मताधिक्य ठेवून खासदार पियुष गोयल यांच्या विजयात भर घातली होती. दरम्यान अतुल भातखळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा झंजावात उभा केला होता. अतुल भातखळकरांनी दहा वर्ष झपाट्याने केलेल्या कामांना घेऊन भाजप महायुतीचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोचले होते. जाहीर सभा, रथयात्रा, पदयात्रा, स्थानिकांच्या भेटी आणि संवाद या माध्यमातून अतुल भातखळकरांनी मतदार संघात यशस्वी प्रचार केला.

कांदिवली (पूर्व)च्या मतदारांनी अतुल भातखळकरांना ८३ हजाराच्या दणदणीत मताधिक्ययाने विजयी केलं आहे. त्यांचा जनतेशी असलेला संपर्क आणि विकासकामांचा झपाटा यामुळे प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य आणि लोकप्रियता सतत वाढताना दिसते आहे. मात्र दहा वर्षांत अतुल भातखळकरांनी कांदिवली (पूर्व) भाजपचा अभेद्य बालेकिल्ला बनवला आहे. या विजयासंदर्भात त्यांनी सांगितलं आहे कि, जनतेने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिसादसाठी त्यांचा आभारी आहे. ज्याप्रमाणे मी १० वर्ष कांदिवलीत विकासकामांचा झंजावात उभा केला होता, त्याप्रमाणे मी पुढची पाच वर्ष सुद्धा कांदिवलीच्या विकासासाठी काम करेन.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरेंना २० देखील जागा गाठत्या आल्या नाहीत, राज्याला तोंड दाखवू नये!

“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांवर जनतेचा विश्वास बसलाय”

राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी!

राऊतांची रडारड; म्हणे निकालाचा कौल जनतेचा नसून लावून घेतलेला

अतुल भातखळकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसचे उमेदवार कालू बुधेलिया यांना उमेदवारी दिली होती. ३० हजार ६१० मते मिळाली. अतुल भातखळकर यांनी मोठ्या मत फरकाने त्यांचा पराभव केला आहे.

Exit mobile version