30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारण‘मुंबईत फक्त आरेतील वृक्ष प्राणवायू देतात का?’

‘मुंबईत फक्त आरेतील वृक्ष प्राणवायू देतात का?’

Google News Follow

Related

मुंबईतील वेगवेगळ्या भागात होणाऱ्या बांधकामांसाठी आणि विकास प्रकल्पांसाठी १ हजार ३०० हून अधिक झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘मुंबईतील मेट्रो व अन्य खाजगी प्रकल्पांमुळे एक हजार ३४६ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे आला आहे. मुंबईत फक्त आरेतील वृक्ष प्राणवायू देतात, त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची या वृक्ष तोडीला काही हरकत नसावी’, असा टोला आमदार भातखळकर यांनी लगावला आहे.

मंगळवारी (१२ ऑक्टोबर) वृक्ष प्राधिकरणाकडे शहरातील विकास कामांसाठी आणि बांधकामांसाठी एक हजार ३४६ वृक्ष तोडण्यासाठी प्रस्ताव आला असून त्यातील २६९ वृक्ष तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. विधान भवन मेट्रो स्थानकासाठी २४ वृक्ष तोडण्यात येणार असून लोअर परेल येथील खाजगी प्रकल्पांच्या बांधकामासाठी २४५ वृक्ष तोडण्यात येणार आहेत. ५७६ वृक्ष प्रत्यारोपण केले जाणार आहेत.

हे ही वाचा:

मनोरंजनाचा पडदा पुन्हा उघडणार

कुर्ल्यात कशा जळल्या २० ते ३० दुचाकी?

मुंबई सायबर विभागाचा ई मेल हॅक; ‘या’ तीन ठिकाणी हॅकर्सचे केंद्र

खडसेंच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार

उर्वरित वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावाबद्दल नोव्हेंबरमध्ये वृक्ष प्राधिकरणाची बैठक होणार आहे. एकाच ठिकाणी २०० हून अधिक वृक्ष तोडण्याबद्द्लचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवले जाणार आहेत. त्यानंतर महाराष्ट्र ट्री ऑथोरिटीसोबत या प्रकल्पांवर चर्चा केली जाईल.

‘शिवसेना फक्त पर्यावरणबद्दल बोलत असतात, पण प्रत्यक्षात दरवर्षी हजारो वृक्ष तोडण्यासाठी परवानगी देतात. त्यांनी मेट्रो प्रकल्प रखडवला आणि आता हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याची कल्पना नाही.’ असे भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांनी ‘टाइम्स’शी बोलताना सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा