भारताने लसीकरण मोहिमेत अनेक टप्पे गाठले आहेत. भारताने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी १०० कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केला होता. त्यानंतर ही मोहीम अशीच सुरू असून या मोहिमेत भारताने अनेक विक्रम पार केले. आताच्या आकडेवारीनुसार भारतात दोन्ही डोस पुरवण्यात भारताने उत्तम कामगिरी केली आहे. याबद्दल नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
अतुल भातखळकर यांनी लसीकरणासंदर्भात आकडेवारी समोर आणली असून या आकडेवारीनुसार भारतात ९० टक्के पात्र लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ६५ टक्के पात्र लोकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे. ही आकडेवारी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन या देशांपेक्षा चांगली आहे. महासत्ता अमेरिकेपेक्षा भारताची लसीकरणाची आकडेवारी चांगली असल्याचे अतुल भातखळकर म्हणाले. त्यांनी यासाठी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
लसीकरणाच्या दोन्ही टप्प्यात भारताची कामगिरी जगात सर्वोत्तम. महासत्ता अमेरिकेपेक्षा भारी. भारताचे कार्यक्षम आणि प्रभावी पंतप्रधान @narendramodi यांचे शतशः धन्यवाद.🙏🙏🙏 pic.twitter.com/pXrpgspnde
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 3, 2022
भारतात लसीकरणाच्या मोहिमेने वेग घेतला असून आजपासून देशातील १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. लहान मुलांना भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली कोव्हॅक्सीन ही लस देण्यात येणार आहे. कोरोनासोबतच आता ओमायक्रॉनने साऱ्या जगाची चिंता वाढवली असून रविवार २६ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट जनतेशी संवाद साधत ही बातमी दिली होती.
हे ही वाचा:
भाजप नेते आर. एन. सिंह यांचे निधन
कोरोनामुळे २ हजार प्रवाशी क्रूझवर अडकले