30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारण'ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा टंचाईचे संकट'

‘ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे कोळसा टंचाईचे संकट’

Google News Follow

Related

देशासोबतच महाराष्ट्रावर वीज टंचाईचे संकट असून या समस्येवर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘कोळसा टंचाईचे संकट हे केवळ महाविकास आघाडी सरकारचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे आलेले आहे,’ असे भातखळकर यांनी सांगितले.

‘नितीन राऊत यांच्या अकार्यक्षमतेमुळे ही वेळ आल्याचे सांगून त्यांनी सांगितले की, या दिवसांमध्ये विजेची गरज जास्त वाढते त्यामुळे कोल इंडियाने आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊन आयात करत असलेल्या कोळशाची कमतरता जाणवेल हेही लक्षात घेऊन राज्याला दोन पत्रे जानेवारी महिन्यात पाठवली होती. बंदिस्त खाणी असल्यामुळे कोळसा साठवणे शक्य आहे; त्यामुळे आता कोळसा घ्या, असे पत्राद्वारे सांगण्यात आले होते. तसेच सव्वातीन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे; त्याबदल्यात केवळ हजार कोटी रुपये भरा आणि कोळसा घ्या, अशी सवलतही केंद्र सरकार म्हणजेच कोल इंडियाने दिली होती. मात्र, याला कुठलेही उत्तर दिलेले नाही.’, असा खुलासा भातखळकर यांनी केला आहे.

हे ही वाचा:

‘मुंबईत फक्त आरेतील वृक्ष प्राणवायू देतात का?’

महिन्याचा पास सक्तीचा असल्यामुळे विनातिकीट प्रवाशांची गर्दी

अतिरेकी संघटना त्यांचे पालनपोषण करणाऱ्यांनाच नंतर पछाडतात!

फडणवीस म्हणतात, ‘मी मुख्यमंत्री नाही हे मला जनतेने कधी जाणवूच दिले नाही’

‘हजार कोटींऐवजी शंभर कोटी रुपये पाठविण्याचे नाटक या सरकारने केले. कारण कोल इंडियाकडून कोळसा विकत घेता येत नाही, असे बोलून खाजगी कंपन्यांकडून कोळसा विकत घ्यायचा, त्यात भ्रष्टाचार करायला वाव मिळेल त्यामुळे हा सुमारे ५०० कोटींचा अतिरिक्त भुर्दंड महाराष्ट्राच्या जनतेवर पडलेला आहे. तसेच वीज खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. मंत्र्यांनी महाजेनकोच्या पैशांनी खाजगी विमाने वापरली, अलिशान बंगले बांधले, या सर्व प्रश्नांची उत्तरे नितीन राऊत यांनी द्यावीत’, असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.

‘आज त्यांनी कितीही सांगितले तरी महाराष्ट्रात येणाऱ्या काळात लोडशेडींग करावे लागेल आणि याला एकमेव कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारची अकार्यक्षमता, भ्रष्टाचार आणि नेहमीप्रमाणे केंद्रावर खापर फोडण्याची सवय.’ अशी टीका त्यांनी केली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पत्रे जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा