‘महाविकास आघाडी सरकारने महाविद्यालये सुरू करण्यावरून केला खेळखंडोबा’

‘महाविकास आघाडी सरकारने महाविद्यालये सुरू करण्यावरून केला खेळखंडोबा’

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालये १२ ऑक्टोबरपासून सुरू होतील, असे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी ८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते. त्यानंतर महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भांत अधिकृत पत्र आमच्या विभागाने दिलेले नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. यावरूनच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली असून हा महाविकास आघाडीचा खेळखंडोबा सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

‘महाविकास आघाडी सरकारने महाविद्यालय प्रवेशाचासुद्धा खेळखंडोबा करून दाखवला आहे. अजित पवार यांनी पुण्यामध्ये सांगितले की, आजपासून महाविद्यालये सुरू होतील. मात्र, ज्यांच्या अखत्यारीत हा विभाग येतो म्हणजेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सांगितले की दिवाळीच्या नंतर महाविद्यालये सुरू होणार. त्यामुळे पुणेकर संभ्रमात पडले आहेत.’ असे भातखळकर यांनी सांगितले.

हे ही वाचा:

लग्नाच्या मंगल कार्यालयात सुरू होते हे ‘अमंगल’ कार्य!

… म्हणून ऐरोली खाडीतले मासे मृत पावले!

‘साहेब फक्त स्टेजवर भिजून उपयोग नाही, आज शेतकरी खरा भिजला आहे’

सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांनी अंदमानच्या काळकोठडीत एकदा राहून दाखवावं

‘डावा हात काय म्हणतोय ते उजव्या हाताला कळत नाही आणि उजवा हात काय करतोय हे डाव्या हाताला कळत नाही, असा हा महाभकास आघाडी सरकारचा भोंगळ कारभार आहे. तो पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आला आहे.’ अशी खोचक टीकाही भातखळकर यांनी सरकारवर केली आहे.

अजित पवारांनी आमच्या विभागाला सूचना केली होती की महाविद्यालये सुरु झाली पाहिजेत. मात्र, महाविद्यालये सुरु करण्याबाबत अधिकृत पत्र आमच्या विभागाने दिले नाही, असे उदय सामंत म्हणाले. काही स्वायत्त संस्थांकडून महाविद्यालये सुरु करण्याचा प्रयत्न झाला. अशा महाविद्यालयांना मंत्री उदय सामंत यांनी विनंती केली आहे की, सरकारचा निर्णय येत्या दोन दिवसांत होईल. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने महत्वाची आहे. राज्यातील सर्व कुलगुरुंशी बोलून उद्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे सामंत म्हणाले.

Exit mobile version