‘यशवंत जाधवांवर झालेल्या कारवाईचे स्पष्टीकरण पक्षप्रमुखांनी द्यावे’

‘यशवंत जाधवांवर झालेल्या कारवाईचे स्पष्टीकरण पक्षप्रमुखांनी द्यावे’

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरावर सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेने छापा मारला आहे. ही छापेमारी आयकर खात्याने केली असून १५ कोटींच्या एका व्यवहाराबाबत ही छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. या छापेमारीनंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ‘टीव्ही ९’ ला प्रतिक्रिया दिली आहे. ही कारवाई त्यामानाने उशिराच झाली असा खोचक टोला यशवंत जाधव यांना लगावला आहे.

अतुल भातखळकर यांनी सांगितले की, प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक आमदार, खासदाराची चौकशी होते. मात्र, कोविड काळात यांनी जो भ्रष्टाचार केला आहे तो बाहेर पडलाच पाहिजे. याचे स्पष्टीकरण शिवसेना पक्ष प्रमुखांनी दिले पाहिजे, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे. चार चार कोविड सेंटर्स यांनी उभारले आणि ते वाटून घेतले. जनेतला जाऊ देत, मरू द्या असे आहे यांचे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. १५ कोटी रुपये यांनी व्हाईट करून घेतले आहेत. आयकर विभागाचा असा अहवाल निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यामानाने ही कारवाई उशिराच झाली, असेही अतुल भातखळकर म्हणाले.

हे ही वाचा:

आयपीएल २०२२चा रणसंग्राम मुंबई, पुण्यात; या तारखेपासून सुरू होणार सामने

युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत; पंतप्रधान मोदींचा पुतीन यांना सल्ला

मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धडकले आयकर खाते

शिवसेनेची आंदोलनाला टांग

यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी आता कायदेशीर कारवाईला सामोरे जायला हवे, असे अतुल भातखळकर म्हणाले. आता हे परत सूडबुद्धीचे रडगाणे सुरू करतील. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे स्वतः १७ वर्षांचे असताना बार परवाना कसा मिळाला या प्रकरणी चौकशीला सामोरे जात आहेत. ते जुने प्रकरण नाही. मात्र, दुसरीकडे नवाब मलिक यांच्यावर जुन्या प्रकरणांचे आरोप होत आहेत, असं बोलत आहेत. संजय राऊत यांची पत्रकार परिषद होऊन १० दिवस झाले, २५ हजर कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रे कुठे गेली? पीएमसी बँक घोटाळ्यात भाजप नेत्यांचा हात असलेली कागदपत्रे कुठे गेली? असे सवाल अतुल भातखळकर यांनी विचारले आहेत. आरोपांवर खुलासा करण्यासाठी यांच्याकडे काहीही नाही. कोट्यवधी रुपये यांच्याकडे कसे येतात आणि हवे तसे हे लोक पैसे वापरतात, असा संतप्त सवाल देखील अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

Exit mobile version