भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे संभाजीनगर का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आणून यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे
१ मे रोजी मुंबई भाजपच्या वतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांची ही सभा बूस्टर डोस सभा असणार आहे. या सभेच्या माध्यमातून फडणवीस हे ठाकरे सरकारवर तुटून पडणार आहेत. तर त्या आधी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.
हे ही वाचा:
मविआ सरकार रझा अकादमीवर बंदी का घालत नाही?
ग्यानव्यापी मशिदीत व्हिडीओग्राफीला नकार; न्यायालयाचा अवमान?
शिवसेना प्रवक्त्यांनी मुख्यमंत्र्यांना असं विचारलं की सर्वसामान्य हिंदुत्ववादी जनता आहे, सामान्य शिवसैनिक आहेत असे प्रश्न विचारत आहेत की हिंदुहृदयसम्राट यांचे चिरंजीव हे स्वतः मुख्यमंत्री असताना ज्या हिंदुहृदयसम्राटांनी आयुष्यभर मशिदीवरील भोंगे खाली उतरवले पाहिजे हे सांगितलं. तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतानासुद्धा मुख्यमंत्री हे का करत नाहीयेत?
दुसरा प्रश्न विचारला की बाळासाहेबांनी औरंगाबादचे संभाजीनगर करा असा आदेश दिला होता. त्यांचे सुपुत्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते डिपारमेंटही त्यांच्याकडे आहे तर मग आता औरंगाबादचे संभाजीनगर का होत नाहीये? हिंदुत्ववादी जनता, कार्यकर्ते प्रश्न विचारतात या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं असं प्रवक्त्यांनी या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुखांना विचारलं. तर या प्रश्नाला काही उत्तर नसल्यामुळे मग ते नेहमीप्रमाणे कोथळा, खंजीर, तुटून पडा असे बोलल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे