उद्धव ठाकरे हे खरे दरोडेखोर!

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला घणाघात

उद्धव ठाकरे हे खरे दरोडेखोर!

या देशात आता चोराला चोर म्हणता येत नाही, असे वक्तव्य करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खणखणीत प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे हेच खरे दरोडेखोर आहेत. यांची घरे भरलेली आहेत. ही संपत्ती कुठून आली याचा हिशेब द्यावा अशी मागणी केली आहे.

विधिमंडळात सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना आमदार भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेतील केवळ १२ हजार कोटीच्या कामाची चौकशी कॅगने केली आहे. पालिकेचा एका वर्षाचा अर्थसंकल्प ३६ हजार कोटींचा असतो. ११ हजार कोटींच्या कामासंदर्भात आक्षेप आहेत. ३२ लोकांना काम दिले त्यांच्यासोबत करार केला नाही. विनानिविदा काम दिलं, काही कामांचे थर्ड पार्टी ऑडिट नाही. महानगरपालिकेने नुकसानभरपाई देऊन अतिक्रमित प्लॉट्स घेतले. हिमनगाचा जसा एक अष्टमांश भाग वर असतो आणि सात अष्टमांश खाली असतो. तसा २५ वर्षातील ३ लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा हा एक अष्टमांश भाग आहे.

एक अष्टमांश भागाचीच नव्हे तर सात अष्टमांश भागाचीही चौकशी करा. त्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा. याची भ्रष्टाचारविरोधी विभागाकडून चौकशी व्हायला हवी. हे पैसे कुठे पोहोचले याचा तपास व्हावा.

हे ही वाचा:

बीबीसीचा निषेध! निषेध!! पंतप्रधान मोदींची बदनामी केल्याबद्दल निंदाव्यजक ठराव

करतारपूर साहिबला भेट देणाऱ्या यात्रेकरूंवर पाकिस्तानची शुल्क सक्ती

हक्कभंगप्रकरणी संजय राऊत यांचा खुलासा समाधानकारक नाही, म्हणून…

राहुल गांधींनी पुन्हा तेच आरोप उगाळले

कोरोना काळातील भ्रष्टाचाराबद्दल विचारलेल्या प्रश्नावर आमदार भातखळकर म्हणाले की, कोरोना काळाताली भ्रष्टाचार बाहेर आला तर यापेक्षा अधिक भ्रष्टाचार बाहेर येईल. आम्हीही तो मांडला आहे. तुम्हीही तो दाखवला आहे. केवळ कोरोना काळातील नव्हे तर आधीच्या भ्रष्टाचाराचीही चौकशी व्हावी.

याचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीशी काही संबंध आहे का, यावर आमदार भातखळकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, महानगरपालिका निवडणुकीशी याचा संबंध नाही. कॅग ही घटनात्मक आणि स्वायत्त संस्था आहे. १२ हजार कोटीत एवढ्या गडबडी कशा काय होतात?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारल्यावर ते संतापून म्हणाले की, उद्धव ठाकरे काहीही बोलतील. चोराला चोर बोलणे हाही या देशात गुन्हा आहे, असे ते म्हणाले. पण हे दरोडेखोर आहेत. यांची घरे भरलेली आहेत. मोदींसारख्या कार्यक्षम पंतप्रधानांना चोर म्हणत आहेत. यांनी मुंबई महानगरपालिका लुटून खाल्ली. उद्धव ठाकरेंनी एवढी संपत्ती कशी निर्माण झाली याचा हिशेब द्यावा. जनता याचा हिशेब मागितल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांनी लक्षात ठेवावे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आज कॅग अहवाल मांडला आणि त्यातून मुंबई महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचारावर प्रहार केला. अधिवेशनात आमदार अतुल भातखळकर यांनी बीबीसीच्या माहितीपटाविरोधात निंदाव्यंजक ठरावही सभागृहात मांडला.

Exit mobile version