राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जातं आहे. या वादात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उडी घेतली आहे. या मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल, असं सामनाच्या लेखातून उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. देशद्रोही दाऊद इब्राहिमशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकला अटक झाल्यानंतरही मंत्रीपदावरून न हाकलणाऱ्या लाचार माजी मुख्यमंत्र्याच्या संतापाला विचारतो कोण? असा सवाल भातखळकरांनी केला आहे.
देशद्रोही दाऊद इब्राहिमशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकला अटक झाल्यानंतरही मंत्रीपदावरून न हाकलणाऱ्या लाचार माजी मुख्यमंत्र्याच्या संतापाला विचारतो कोण? pic.twitter.com/BvPs9SJK1E
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 9, 2022
महाविकास आघाडीचे सरकार असताना कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात नवाब मलिक तुरुंगात आहेत. मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात मलिकांचा संबंध असल्याचा आरोप करत ईडीने त्यांना फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. अटकेनंतरही त्यांचे मंत्रिपद कायम होते. कुख्यात गुंड दाऊदशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मलिकांना मंत्रिपदावरून हटवावे अशी मागणी भाजपा करत होते. भाजपाने अनेक वेळा आंदोलन करूनही मलिकांना मंत्रिपदावरून हटवण्यात आले नव्हते. त्यांच्यकडून मविआने फक्त अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेतला होता. त्यामुळे ते मविआच्या कार्यकाळात बिनखात्याचे मंत्री म्हणून राहिले होते.
हे ही वाचा:
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घेतली नव्या सरन्यायाधीश पदाची शपथ
‘खोक्या’बद्दल लवकरच सुप्रिया सुळेंना नोटीस देण्याची तयारी
दिल्ली, उत्तर भारतासह नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
भारत जोडो यात्रेत शरद पवारांऐवजी ; दुसरे नेते होणार सामील
यादरम्यान, सत्तार यांच्या वक्तव्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून हाकलण्याची भाषा उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या लेखावरून अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विटरद्वारे सवाल केला आहे.