उद्धव ठाकरे फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हणतात आणि त्यांना भेटायलाही येतात, याची कीव येते!

आमदार अतुल भातखळकर यांची खोचक टीका

उद्धव ठाकरे फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हणतात आणि त्यांना भेटायलाही येतात, याची कीव येते!

नागपूरमध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. उद्धव ठाकरे यांनी अभिनंदनासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली की विरोधी पक्षनेतेपदासाठीच्या चर्चेसाठी भेट घेतली असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली होती. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर म्हणाले की, “उद्धव ठाकरेंची कीव येते. उद्धव ठाकरे भाषणात देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले होते की, एकतर मी राहीन किंवा हा राहील. देवेंद्र फडणवीस हे नागपूरवरचे कलंक आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली होती आणि त्याचं नागपुरात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांना भेटावं लागतंय याच्यापेक्षा त्यांची वैफल्यग्रस्त आणि दुर्दैवी अवस्था कुठलीच असू शकत नाही,” अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही केलं. या भेटीनंतर त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली.

हे ही वाचा..

भोजनालयात धूम्रपान : मलेशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांना दंड

सर्व धार्मिक स्थळे सरकारच्या नियंत्रणाखाली आणा! विशिष्ट धर्माचीच का?

कुर्ला बस अपघात प्रकरण, बेस्ट कंत्राटदाराला ठोठावणार ४ लाखांचा दंड!

दहशदवाद्याच्या अंतयात्रेला हजारो मुस्लिमांची उपस्थिती

या भेटीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना विरोधी पक्षही भेटतो. इतर पक्षाचे नेतेही भेटतात. पण हे चित्र पाहिल्यानंतर टोकाची टीका करणारे, अगदी संपवण्याची भाषा करणारे, जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये एक आमूलाग्र बदल झालेला दिसत आहे. देवेंद्र फडणवीसांना भेटणं गैर नाही. पण याला भेट, त्याला भेट आणि दुसर्‍या दिवशी घरी थेट अशी ही परंपरा आहे,” असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Exit mobile version