भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस ठाण्याच्या परिसरात झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. यासंपूर्ण प्रकरणावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ‘टीव्ही ९’ला प्रतिक्रिया दिली.
राज्यातील परिस्थिती ही शंभर टक्के चिंता व्यक्त करण्यासारखीच आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले. किरीट सोमय्या यांना सुरक्षा असतानाही खार पोलीस ठाण्याच्या परिसरात त्यांच्यावर हल्ला होतो. त्यानंतरही शिवसैनिकांवर एफआयआर दाखल झालाच नाही तर एफआयआर दाखल झाला किरीट सोमय्या यांच्या ड्रायव्हरवर आणि त्यातही राज्याचे गृहमंत्री प्रश्न विचारत आहेत की, हल्ला कृत्रिम होता का? राज्यात गुंडांच राज्य आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल
सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहसचिव आवश्यक पावलं उचलणार
कर्नाटकमध्ये दोन दलित तरुणांची हत्या
लाकडांमध्ये लपवले होते ७०० कोटींचे हेरॉईन
कायद्याचे रक्षकच सध्या भक्षक बनलेले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कायदा हातात घेत आहेत, अशी टीकाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर बोलायला हवे मात्र त्यांना कंठ तेव्हाच फुटतो जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार विरोधी बोलायचे असते, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.