‘ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत’

‘ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी २३ जानेवारी रोजी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. मात्र, त्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांकडून उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वीर टिपू सुलतान क्रीडासंकुलाचे काम पालकमंत्री अस्मल शेख यांच्या निधितून झाल्याचा उल्लेख आहे. अशा नावाची कमान या फोटोमध्ये आहे. अतुल भातखळकर यांनी ‘ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये साकारतायत वीर टिपू उद्याने. यांच्या बोगस बेगडी विचारधारेचे असे खंडीभर पुरावे देता येतील. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत.’ असे म्हटले आहे.

ठाकरे सरकारवर मुघल ए आझम-२ काढता येईल असे हिरवे वातावरण गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात निर्माण झाले आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

हे ही वाचा:

पोटात लपवल्या होत्या हेरॉईनच्या ३८ गोळ्या

मुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर?

ओमायक्रोन सब व्हेरिएंट BA.2 ची देशात एंट्री

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारांची घोषणा

‘दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेनाप्रमुखांनी पाहिले, आपण दिल्ली काबीज करु’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मी घराबाहेर पडायला असमर्थ आहे, असे समजू नका. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, तलवार कशी गाजवायची हे चांगले माहित असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले यावर अतुल भातखळकर यांनी ‘घराबाहेर पडू शकतो हेही सांगावे लागते, काय दिवस आलेत…’ असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Exit mobile version