मुंबईला समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी महापालिकेने वातावरण कृती आराखडा तयार केला असून मुंबईला पाण्याखाली जाण्यापासून रोखण्यासाठी हा कृती आराखडा तयार केल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. त्यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता हातात असून आपल्या दारातील मिठी नदी पुनरुज्जीवित न करू शकणारे मुख्यमंत्री मुंबई बुडण्यापासून वाचवणार आहेत म्हणे,” असा टोला अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. “मुंबईकरांना तुम्ही मूर्ख समजता काय?” असा संतप्त सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानालाच खेटून असलेल्या बीकेसीतून ही मिठी नदी वाहात होती. पण तिथे उभ्या राहिलेल्या इमारती आणि बांधकामांमुळे ही नदी हळूहळू लुप्त झाली.
गेली २५ वर्षे महापालिकेची सत्ता हातात असून आपल्या दारातील मिठी नदी पुनरुज्जीवित न करू शकणारे मुख्यमंत्री मुंबई बुडण्यापासून वाचावणार आहेत म्हणे.
मुंबईकरांना तुम्ही मूर्ख समजता काय? pic.twitter.com/o0pj4TTrRI— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 14, 2022
महाराष्ट्राची निम्म्याहून अधिक लोकसंख्या शहरांमध्ये राहते. त्यामुळे मुंबई प्रमाणेच इतर शहरांनीही असाच कृती आराखडा तयार करून अमलात आणावा, तसेच आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून सहकार्य मिळेल, असे आश्वासन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
हे ही वाचा:
रविवारच्या दिवशी काश्मीर फाईल्स ठरला बंपर हिट! केली इतक्या कोटींची कमाई…
कॅनडामध्ये अपघातात पाच विद्यार्थ्यांना मृत्यू
मुंबईकर नव्या आयुक्तांना म्हणतायत ‘थोडा सास तो लेने दो सर’
त्या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका! चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
मुंबई वातावरण कृती आराखडा हा देशातीलच नव्हे, तर बहुधा जगातील पहिलाच कृती आराखडा आहे. गारगाई पिंजाळ धरणाचा प्रकल्प अहवाल तयार असताना, पाच लाख झाडे वाचवण्यासाठी हा प्रकल्प रद्द केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नियोजित मलनिःसारण प्रकल्प, समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प, किनारी मार्ग प्रकल्प, मध्य वैतरणा धरणावरील संकरित ऊर्जा प्रकल्प, गोरेगाव- मुलुंड जोडरस्ता प्रकल्प सुरू असल्याचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.