टीएमसी खासदाराचा मुस्लीम मतांसाठी किती आटापिटा?

आमदार अतुल भातखळकरांनी केला सवाल

टीएमसी खासदाराचा मुस्लीम मतांसाठी किती आटापिटा?

वक्फ बोर्डाने देशभर जमिनी बळकावण्याचा सपाटा लावला आहे. यात प्राचीन मंदिरापासून केंद्रीय सरकारच्या जमिनींवरही वक्फ बोर्डाचा डोळा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वक्फ बोर्डाला आळा घालण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक आणले होते. या विधेयकाची समीक्षा करण्यासाठी सध्या संयुक्त संसदीय समितीची स्थापना करून विधेयक पाठवण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी समितीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले. बैठकीत हाणामारी झाल्यानंतर जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी टीएमसी खासदाराला पुढील बैठकीसाठी निलंबित केल्याचं सांगितले. यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जींवर एक्स अकाउंट वरुन टीकास्त्र डागले आहे. “यथा राजा तथा प्रजा. वक्फ विधेयकावर संयुक्त संसदीय समितीची बैठक सुरु असताना तृणमूलचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांची भाजपचे सदस्य अभिजीत गंगोपाध्याय यांच्याशी जोरदार वादावादी झाली. यावेळी कल्याण बॅनर्जी एवढे संतापले की त्यांनी एक काचेची बाटली फोडली आणि तिथेच फेकून दिली. यामुळं त्यांच्या अंगठ्याला आणि तर्जनीला जखम झाली. मुस्लीम मतांसाठी किती हा आटापिटा?” असा सवाल आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा : 

गँगस्टर छोटा राजनला जामीन

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात दिवाळी कार्यक्रमादरम्यान राडा

कर्नाटकात निर्माणाधीन इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू

“आमचे संबंध इतके घनिष्ठ की, कोणत्याही अनुवादकाची गरज नाही”

संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजपचे सदस्य अभिजीत गंगोपाध्याय यांची बाचाबाची झाली. कल्याण यांनी बैठकीत चर्चेच्या दरम्यान भाजपा खासदारांशी वाद करताना कल्याण बॅनर्जी यांनी पाण्याची काचेची बाटली फोडली आणि तिथेच फेकून दिली. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली आणि हाताला चार टाके पडले आहेत. यानंतर जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी टीएमसी खासदाराला पुढील बैठकीसाठी निलंबित केले आहे.

Exit mobile version