वस्तू व सेवा करापोटी (GST) राज्यांना द्याव्या लागणाऱ्या भरपाईची रक्कम केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. महाराष्ट्र राज्यालाही रक्कम मिळाली असून राज्य सरकारने इंधनावरचा कर कमी करावा अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत होती. मात्र, जीएसटीचे पैसे हे केंद्र सरकारने पेट्रोल- डीझेलचे दर कमी करण्यासाठी दिलेले नाहीत, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यानंतर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “जनतेला दिलासा ही फुटकळ बाब. मंत्र्यांसाठी गाड्या, बंगल्याचे नुतनीकरण, विरोधकांचे खटले लढवण्यासाठी महागडे वकील हे महत्त्वाचे,” असे म्हणत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे.
जनतेला दिलासा ही फुटकळ बाब, मंत्र्यांसाठी गाड्या, बंगल्याचे नूतनीकर, विरोधकांचे खटले लढवण्यासाठी महागडे वकील हे महत्त्वाचे… pic.twitter.com/bGNCmNXlXE
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 3, 2022
राज्यात इंधनाचे दर कमी करण्याची मागणी होत असताना केंद्र सरकारकडे जीएसटीचे पैसे अडकल्याचे ठाकरे सरकारच्या मंत्र्यांकडून सातत्याने सांगण्यात येत होते. त्यामुळे अखेर केंद्र सरकारने सर्व राज्यांचे हे पैसे दिल्यावर आता तरी उठसूट केंद्राकडे बोट दाखवणारे ठाकरे सरकार आता तरी इंधनावरचा कर कमी करेल का? महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देईल का? असे प्रश्न भाजपाने उपस्थित केले होते.
केंद्राने महाराष्ट्राचा तब्बल 14145 कोटी रुपयांचा GST परतावा दिला आहे, त्याबद्दल पंतप्रधान श्री @narendramodi जी व श्रीमती @nsitharaman जींचे खूप खूप आभार.
उठसूट केंद्राकडे बोट दाखवणारी ठाकरे सरकार आता तरी इंधनावरचा कर कमी करेल का? महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देईल का? pic.twitter.com/lKVwUmZ3Cy
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 31, 2022
हे ही वाचा:
राहुल गांधींना ईडीचे पुन्हा समन्स
… म्हणून तुर्की आता तुर्किये नावाने ओळखला जाणार
भोंग्याच्या विषयाचा आता तुकडा पाडूनच टाकू!
जम्मू काश्मीरमध्ये दोन हल्ल्यांत मजुरासह बँक मॅनेजरचा मृत्यू
“पेट्रोल, डिझेलचे दर आम्ही यापूर्वी कमी केलेच आहेत. जीएसटीचे आलेले पैसे केंद्र सरकारनं काही पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यासाठी दिलेले नाहीत. हे मागच्या काळात येणारे पैसे आहेत. थकबाकी होती,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती. दरम्यान, केंद्राने महाराष्ट्राचा तब्बल १४ हजार १४५ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा दिला आहे.