23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण'शिवसेनेच्या या दंडेलीला मी घाबरणार नाही'

‘शिवसेनेच्या या दंडेलीला मी घाबरणार नाही’

Google News Follow

Related

भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात त्यांच्या कांदिवली मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने पोस्टर्स लावण्यात आली असून त्या दंडेलीला आपण घाबरणार नाही. मतदार संघात वसुलीसेनेच्या सौजन्याने माझ्याविरोधात पोस्टर लागली आहेत. पोलीस ठाण्यात याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केलेली आहे. असले चाळे करून कोणी माझा टक्केवारी सेनेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज दाबू शकत नाही हे लक्षात असू दे, असा इशारा आमदार भातखळकर यांनी दिला आहे.

यासंदर्भात आमदार भातखळकर यांना पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून माझ्या मतदारसंघात मोठी पोस्टर रात्री लावण्यात आली. याचा मी याचा धिक्कार करतो. असल्या दबावतंत्राला मी घाबरणार नाही. महाराष्ट्र व  माझ्या जनतेचा आवाज मी उठवत राहणार. आम्ही अशा भेकड धमक्यांना मी आणि भाजपा घाबरणार नाही.

आमदार अतुल भातखळकर यांनी सातत्याने शिवसेनेवर जोरदार प्रहार केलेले आहेत. राज्यात सत्तेत आलेल्या आघाडी सरकारला त्यांनी आपल्या तिखट आणि परखड भाषेत धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी केलेली अनेक ट्विट्स वर्मी लागलेली आहेत.

यावेळी नवाब मलिक यांच्याविरोधात सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेबद्दलही ते बोलले. या स्वाक्षरी मोहिमेत चक्क विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही स्वाक्षरी केल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याबद्दल भातखळकर यांना विचारल्यावर ते म्हणाले की, यांच्या मनात आजही देशभक्ती आहे. राज्याचं हिताला ते प्राधान्य देतात हे यातून लक्षात येतं त्यामुळे मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

हे ही वाचा:

युक्रेनचे सर्वात मोठे मालवाहू विमानही हल्ल्यात उद्ध्वस्त

पहिल्या दिवसाअखेर भारताने चढवल्या ३५७ धावा

‘एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरण अशक्य’

‘येणारा काळ युक्रेनसाठी अधिक कठीण’

 

ओबीसी आरक्षण हा आता चा महत्त्वाचा मुद्दा आहे, असेही ते म्हणाले. याविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. गेल्यावेळेला आम्ही खुर्चीवरून उठवलंही नव्हतं तरी आमचं निलंबन केलं होतं. ओबीसीला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही भातखळकर यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा