“श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं बोलण्याचं धाडस काँग्रेस गटारगंगेतील नेताच करू शकतो”

“श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं बोलण्याचं धाडस काँग्रेस गटारगंगेतील नेताच करू शकतो”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी गीतेबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात वातावरण ढवळून निघाले आहे. शिवराज पाटील यांनी गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. फक्त कुराण आणि बायबलमध्ये जिहाद नसून श्रीकृष्णही अर्जुनाला जिहाद सांगायचे, अशा आशयाचं वक्तव्य शिवराज पाटील यांनी केलं आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्राचे प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील म्हणाले की, “इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. केवळ कुराणच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही हेच सांगितले आहे.”

यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस आणि शिवराज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं बोलण्याचं धाडस काँग्रेस गटारगंगेतील नेताच करू शकतो. मुस्लीम मतांसाठी किती शेण खाणार?” अशी सणसणीत टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

“शिवराज पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडले आहे. ज्या काँग्रेसने रामाचं अस्तित्व नाकारलं. राहुल गांधींनी अमेरिकेत झालेल्या मुलाखतीत सांगितले की हिंदू दहशतवाद आहे. ज्या काँग्रेसने अल्पसंख्यांकांचं लांगुलचालन केलं, दहशतवादी आणि नक्षलवादी यांचं समर्थन केलं, त्या पक्षाचे नेते शिवराज पाटील यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे? त्यांचं डोकं सडलेलं आहे. काँग्रेसची विचारसरणीच सडलेली आहे,” अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Exit mobile version