राज्याच्या राजकारणात सध्या जेम्स लेन प्रकरण गाजत असताना आता भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केल्याचे मला दुःख नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. बाबासाहेब यांच्या लिखाणामुळे त्यांच्या विरोधात बोलल्याचे शरद पवार म्हणाले होते. आता शरद पवार आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा एक जुना व्हीडिओ व्हायरल झाला असून त्या व्हीडिओवरून आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना लक्ष्य केले आहे.
एका जाहीर कार्यक्रमात शरद पवार हे बाबासाहेब पुरंदरे यांचे कौतुक करताना दिसत आहेत. बाबासाहेब यांच्यामुळे लोकांना महाराष्ट्रातील किल्ल्याचं आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती कळत आहे. त्यांनी केलेल्या सखोल अभ्यासामुळे पुढील पिढीला ज्ञान मिळत असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मान केल्याचा आपल्याला आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे तेव्हा त्यांनी केलेल्या अभ्यासाचे शरद पवार यांनी कौतुक होते आणि आता त्यांच्या लिखाणावर टीका केल्यामुळे अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
यानंतर अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “पवारसाहेब या कोलांट्या पाहून तुम्हाला कधी कधी साष्टांग दंडवत घालावासा वाटतो.”
पवारसाहेब या कोलांट्या पाहून तुम्हाला कधी कधी साष्टांग दण्डवत घालावेसे वाटते… pic.twitter.com/TukuAHtaMO
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 18, 2022
हे ही वाचा:
मुंबईच्या आरे कॉलनीत कळस यात्रेत हिंसाचार
अमरावतीत हिंसाचार; कलम १४४ लागू
नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; भोंग्यासाठी परवानगी घ्या अन्यथा….
आमदार गणेश नाईक यांच्या प्रेयसीची तक्रार; बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा
“जेम्स लेनने जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छपणे लिहलं होतं की, ही माहिती मी पुरंदरेंकडून घेतली. त्यामुळे एक गलिच्छ अशा प्रकारचं लिखाण एखाद्या लेखकाने केलं आणि त्याला माहिती पुरवायचं काम कोणी केलं हे उघड होत असेल आणि त्याचा खुलासा कधी बाबासाहेब पुरंदरेंनी केला नाही म्हणून तर त्याच्यावर टीका-टिप्पणी केली असेल तर मला त्यात दु:ख वाटत नाही. याउलट मला त्याचा अभिमान वाटतो,” असे म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले होते.
मात्र, त्यानंतर जेम्स लेन याने आपल्या ‘Shivaji: Hindu King in Islamic India’ पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते. कोणीही मला माहिती पुरवली नाही, असे स्पष्ट केले आहे.