महाराष्ट्रात सध्या नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीवरून चांगलेच राजकारण तापताना दिसत आहे. या कारवाईमुळे राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. अशातच भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. शरद पवारांची उडी जात आणि धर्माच्या पलीकडे जात नाही असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्या चौकशी संदर्भात प्रतिक्रिया देताना या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम समाजातील कार्यकर्ता असेल तर त्याचा संबंध दाऊदशी जोडला जातो असे पवार यांनी म्हटले आहे. तर नवाब मलिक यांच्यावर होणाऱ्या कारवाईची आम्हाला शक्यता वाटत होती असे ते म्हणाले. त्यांच्या याच प्रतिक्रियेवरून मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा:
मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचे नाव दाऊद सोबत जोडले जाते
‘दाऊद सबंधितांशी नवाब मलिकांचे व्यावसायिक संबंध’
नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु! आज अटक होणार?
१९ बंगल्यांप्रकरणी सोमय्या राज्यपालांच्या भेटीला
आदरणीय नेते @PawarSpeaks यांची उडी अजूनही जात आणि धर्मा पलिकडे जात नाही हे दुर्दैवी. pic.twitter.com/HgZy0tSloi
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 23, 2022
भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांना लक्ष्य केले आहे. “आदरणीय नेते शरद पवार यांची उडी अजूनही जात आणि धर्मा पलिकडे जात नाही हे दुर्दैवी.” असे भातखळकर यांनी म्हटले आहे. तर “मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हे होणारच होते’, असे उसासे सोडलेत. दाऊदशी संबंध ठेवणे, व्यवहार करणे हे त्यांच्या दृष्टीने फारसे गंभीर नाही ? नसेल तर त्याची काही विशेष करणे आहेत का?” असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.
मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ज्येष्ठ नेते @PawarSpeaks यांनी 'हे होणारच होते', असे उसासे सोडलेत.
दाऊदशी संबंध ठेवणे, व्यवहार करणे हे त्यांच्या दृष्टीने फारसे गंभीर नाही ? नसेल तर त्याची काही विशेष करणे आहेत का?— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 23, 2022