“पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा”

आमदार अतुल भातखळकर यांनी केली मागणी

“पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा”

गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हे आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळं मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

हे ही वाचा:

उत्तरप्रदेशमध्ये भिंत कोसळून चौघांचा मृत्यू

पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले

“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत यांना या प्रकरणातले प्रमुख आरोपी म्हणण्यात आलं आहे. वाधवान बंधूंसोबत संगनमत करून संजय राऊतांनी पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावले असल्याचंही या आरोपपत्रात म्हटलं आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असाही उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

Exit mobile version