विरोधी पक्षनेत्यांनी सातत्याने लावून धरलेल्या मनसुख हिरेन प्रकरणाचा आणि अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास देखील केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी पक्षांकडून सातत्याने हा महाराष्ट्राच्या स्वायत्ततेवरील घाला असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रातून कावळ्या आणि कोंबड्या मेल्या तरी केंद्रीय यंत्रणा तपासाला येतील असे लिहीले होते. भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्वीट करून राऊत यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.
हे ही वाचा:
राज्यपालांनी सत्यकथन करणारा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवावा
ज्युलिओ रिबेरोंकडून शरद पवारांच्या मागणीला केराची टोपली
पवारांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश
अतुल भातखळकर म्हणतात, ‘कावळे आणि कोंबड्या मेल्या तरी केंद्रीय यंत्रणा तपासाला येतील’,असे ‘कार्यकारी’ राऊत म्हणालेत. खंडणीच्या खेळात मनसुखसारख्या निरपराधाचा जीव जातो,त्यावर इतकी निलाजरी आणि निबर प्रतिक्रिया असूच शकत नाही. राज्यातले राज्यकर्ते दरोडा घालू लागले तर तपास केंद्र सरकारलाच करावा लागेल ना? अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
'कावळे आणि कोंबड्या मेल्या तरी केंद्रीय यंत्रणा तपासाला येतील',असे 'कार्यकारी' राऊत म्हणालेत.
खंडणीच्या खेळात मनसुखसारख्या निरपराधाचा जीव जातो,त्यावर इतकी निलाजरी आणि निबर प्रतिक्रिया असूच शकत नाही. राज्यातले राज्यकर्ते दरोडा घालू लागले तर तपास केंद्र सरकारलाच करावा लागेल ना?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 22, 2021
विरोधकांनी सातत्याने हा विषय लावून धरला होता. त्यामुळे अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास एनआयएने करायला सुरूवात केली होती. तर मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसतर्फे केला जात होता. यात एटीएसला या तपासात मोठे यश प्राप्त झाले आहे.