भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी महाराष्ट्रामधील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यापूर्वी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनीही औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते. यावरून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती. राकेश टिकैत यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, “किसन आंदोलनात दिल्लीच्या सीमेवर जाऊन राकेश टिकैत यांना मिठ्या मारणारे महाराष्ट्रातील ज्वलंत हिंदुत्वाचे ब्रम्हांडातील प्रवक्ते, सर्वज्ञानी संपादक आता औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या राकेश टिकैत यांचा एका शब्दाने तरी निषेध करतील का?” असा सणसणीत सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
किसन आंदोलनात दिल्लीच्या सीमेवर जाऊन राकेश टीकैत यांना मिठ्या मारणारे महाराष्ट्रातील ज्वलंत हिंदुत्वाचे ब्रम्हांडातील प्रवक्ते, सर्वज्ञानी संपादक आता औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्या राकेश टिकैत यांचा एका शब्दाने तरी निषेध करतील का? pic.twitter.com/puOn8nF4PW
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 3, 2022
हे ही वाचा:
‘जनतेला दिलासा फुटकळ बाब; मंत्र्यांना नव्या गाड्या, बंगले महत्त्वाचं’
राहुल गांधींना ईडीचे पुन्हा समन्स
… म्हणून तुर्की आता तुर्किये नावाने ओळखला जाणार
भोंग्याच्या विषयाचा आता तुकडा पाडूनच टाकू!
राकेश टिकैत यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याचे फोटो समोर येताच सर्वच स्तरांवरून त्यांच्यावर टीका होत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव गौरव गौतम यांनीही ट्विट करत म्हटले आहे की, “आता औरंगजेब हा सुद्धा शेतकरी होता आणि त्याने कशी निर्दोष हिंदूंची हत्या केली, असे बोलणार आहेत का राकेश टिकैत,” असा सवाल त्यांनी विचारला आहे.