24 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारणसंजय राऊत, तोंड सांभाळून बोला नाहीतर तोंड फुटेल!

संजय राऊत, तोंड सांभाळून बोला नाहीतर तोंड फुटेल!

आमदार अतुल भातखळकर यांची खरपूस टीका

Google News Follow

Related

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत आहेत, पण खालच्या भाषेत आता ही टीका केली जाऊ लागली आहे. त्यातून त्यांनी महापुरुषांच्या अवमानाबद्दल ते केंद्रीय नेतृत्वावर, केंद्रीय मंत्रिमडळावर प्रहार करत आहेत. त्यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे.

संजय राऊत म्हणाले होते की, केंद्रातले मंत्री खुर्च्यांना फेविकॉल लावून बसले आहेत. अपमानाबद्दल बोलत नाहीत. आम्हाला वाटले केंद्रामधून एखादा स्वाभिमानी लाल उभा राहील आणि अपमानाबद्दल बोले. त्यावर आमदार भातखळकर म्हणाले की, राऊत गांडू कुणाला म्हणत आहात. तोंड सांभांळून बोला नाहीतर तोंड फुटेल.

भातखळकर यांनी सांगितले की, संजय राऊत यांच्याकडून वारंवार केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल अभद्र भाषेचा वापर होतोय. रोज अशी भाषा ते वापरत आहेत. त्यांना एवढेच म्हणेन की, तुम्हाला इडीने अटक केली होती, कोविड घोटाळ्याचेही आरोप तुमच्यावर आहेत. तुम्ही जामिनावर बाहेर आहात. तुमची भाषा सुधारा, जिभेला लगाम घाला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांकडून पुराव्याची मागणी केली होती. त्यांचा अपमान तुम्ही केलात. आपले नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची माहिती नव्हती, स्वराज्याची स्थापना कधी केली हेही त्यांना माहीत नव्हते. तेव्हा संजय राऊत तुमच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करूच. पण जर अभद्र भाषेचा प्रयोग सुरू राहिला तर आपल्याच भाषेत आपल्याला उत्तर दिले जाईल, हे लक्षात ठेवावे.

हे ही वाचा:

वधूवर सूचक वेबसाइटवरून ओळख करून घेत त्याने १० लाखांना लुटले

बॉलिवूड तारे -तारकांनाही पब्लिक हॉलिडे

भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली हादरले

स्वैराचाराविरोधात माझा लढा सुरूच राहणार!

संजय राऊत हे गेल्या काही दिवसांत फडणवीस शिंदे सरकारवर खालच्या भाषेत टीका करत असून त्यावरून त्यांच्यावरही टीका होत आहे. संजय राऊत यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून दिली जात आहे. एकनाथ शिंदे आणि ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर संजय राऊत यांनी या आमदारांविरोधात मोहीम उघडली पण त्यांच्या भाषेचा स्तर हळूहळू अतिशय खाली घसरत गेला. किरीट सोमय्या असतील, सोडून गेलेले आमदार असतील त्यांनी खालच्या भाषेत त्यांच्यावर टीका केली. वैयक्तिक स्वरूपाची टीका करतानाच शिव्यांचाही वापर केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा