‘राऊतांचे म्हणजे आम्ही बोलू ते धोरण आणि बांधू ते तोरण असे आहे’

‘राऊतांचे म्हणजे आम्ही बोलू ते धोरण आणि बांधू ते तोरण असे आहे’

संजय राऊत यांच्यावर त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कार्ट अशी भूमिका कायद्यासमोर चालत नाही, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला आहे, त्यामुळे त्यांनी आता पुढे जे आहे त्याला सामोरे जायला हवे, असे अतुल भातखळकर यांनी सांगितले आहे. यांचे म्हणजे आम्ही बोलू ते धोरण आणि बांधू ते तोरण असे आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

हे ही वाचा:

हरनाज संधू बनली ‘मिस युनिव्हर्स’

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झाली काशी

संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल

वाघाने बंद केले वऱ्हाडाला; घरातच लागले लग्न

हरामखोर या शब्दाला यांनी नॉटी हा शब्द सांगितला होता. तुमच्या मनासारखे सगळे नाही होणार, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले. त्यांनी उच्चारलेला शब्द उच्चारताही येणार नाही आम्ही संस्कृती पाळणारे लोक आहोत, असे भातखळकर यांनी म्हटले. त्यामुळे त्यांनी आता माफी मागावी आणि विषय संपबून टाकावा, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांचा शरद पवार यांना खुर्ची देतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोवरून भाजपच्या काही नेत्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. त्याविषयी बोलताना संतप्त संजय राऊत यांनी सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण आणू नका. ×××गिरी बंद करा असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

Exit mobile version