शिवसेनेवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा घणाघात
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवार, २९ जुलै रोजी एका कार्यक्रमादरम्यान मुंबई संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर सर्वच स्तरांवरून राज्यपालांवर टीका करण्यात येत आहे. राजकीय पक्ष देखील यावरून टीका करत असताना संजय राऊत यांनीही टीका केली आहे. त्यानंतर अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा लगावला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या, मंगेशकर कुटुंबीयांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपत असताना शिवसेनेला मराठी बाण्याचा विसर पडला होता. अशांनी राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करून मराठीच्या नावाने थयथयाट न केलेला बरा,” अशी घणाघाती टीका अतुल भातखळकर यांनी ट्विट करून केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्या, मंगेशकर कुटुंबीयांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपत असताना शिवसेनेला मराठी बाण्याचा विसर पडला होता. अशांनी मा.राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करून मराठीच्या नावाने थयथयाट न केलेला बरा.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 30, 2022
हे ही वाचा:
राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही
संजय राऊतांची शिवीगाळ करत असतानाची ऑडियो क्लिप व्हायरल
धनुष्यातील ‘बाणा’सोबत ‘अर्जुन’ही शिंदेंसोबत
राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी
शुक्रवार, २९ जुलै रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं राज्यपाल म्हणाले. यावरून राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली जात आहे.